सोलापूर,दि.७: धनादेशावर बनावट सहीचा वापर करीत तिघा नोकरांनी मिळून ९० हजार रुपये काढून वयोवृध्द महिलेची फसवणूक केल्याची घटना घडली
आहे.
तारा जगदीश जाजू (वय ६७, रा. सम्राट चौक) यांनी
दिलेल्या फिर्यादीवरून सुदर्शन साका, अरविंदा साका, निशिकांत बुलबुले यांच्याविरुध्द फौजदार
चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वरील तिघे फिर्यादीच्या दुकानात नोकर म्हणून कामाला होते. या तिघांनी मिळून फिर्यादीच्या बनावट सहीचा वापर करून ४५ हजाराच्या दोन धनादेशाद्वारे परस्पर ९० हजार रुपये काढून फसवणूक केली.