सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज शनिवारी ग्रामीण भागातील तब्बल 330 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 194 पुरुष तर 136 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 186 आहे. आज 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 7390 इतकी झाली आहे. यामध्ये 4432 पुरुष तर 2958 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 205 जणांचा मृत्यू झाला आहे यात 141 पुरुष तर 64 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 2905 आहे .यामध्ये 1785 पुरुष 1120 महिलांचा समावेश होतो आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 4280 यामध्ये 2506 पुरुष तर 1774 महिलांचा समावेश होतो.
अक्कलकोट 10 बार्शी 106 करमाळा 08 माढा 30 माळशिरस 42 मंगळवेढा 19 मोहोळ 10 उत्तर सोलापूर 11 पंढरपूर 73 सांगोला 14 दक्षिण सोलापूर 7 असे एकूण 330 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
बार्शी 2 ,माढा 2 ,माळशिरस 2,मोहोळ 1, मंगळवेढा 1 व्यक्ती मरण पावली आहे.