सोलापूर ब्रेकिंग :
– दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील मतिमंद निवासी शाळेतील 42 विद्यार्थी आणि 8 शिक्षक पॉझिटिव्ह
– शाळा सुरु झाल्यानंतर जिल्हाभरातील विद्यार्थी आले होते निवासासाठी
– 14 फेब्रुवारी रोजी 6 विद्यार्थी पॉझिटिव्ह आले त्यानंतर काल उर्वरित विद्यार्थी आणि शिक्षक पॉझिटिव्ह
– सर्व विद्यार्थी निवासी शाळेतच आयसोलेट
संस्थाचालक अण्णाराव राजमाने आणि जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल कुमार जाधव यांनी दिली माहिती
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या जिव्हाळा शेतकी कर्मशाळेतील 42 विद्यार्थी आणि 8 शिक्षक कर्मचारी अशा 50 जणांना कोरोना ची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर या सर्वांवर उपचार सुरू झाले आहेत.
या संस्थेचे प्रमुख अण्णाराव राजमाने तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी शीतल कुमार जाधव यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. या सर्व विद्यार्थी, प्रशिक्षक यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांची नित्य नियमित तपासणी आणि औषध उपचार सुरू आहेत असं सांगण्यात आलं. दिव्यांग (मतिमंद) मुलांना या शाळेत शेती तसेच अन्य प्रशिक्षण दिलं जातं. 12 तारखेला या शाळेतील काही शिक्षकांना त्रास होऊ लागल्यानंतर संपूर्ण शिक्षक आणि कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली .यावेळी प्रथम 6 जण कोरोना बाधित आढळले. यानंतर आणखी काही जणांची पुन्हा तपासणी करण्यात आली तेव्हा ही संख्या दुपटीने वाढली. सद्यस्थितीत 42 मुलं आणि 8 शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांवर कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचार सुरू आहेत. यात दोन महिलांचाही समावेश आहे.
65 वर्षीय एका जेष्ठ नागरिकास अधिक त्रास असल्याने सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलंय. तर बाकीच्या सर्व जणावर याच शाळेच्या परिसरात उपचार सुरू आहेत. शाळेत काही अनाथ मुलं ही आहेत. त्यांच्यावर तिथेच उपचार करण्यात येत आहेत, तर ज्यांचे पालक आहेत आणि आजारी नाहीत अशा विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं आहे. या कर्मशाळेचा परिसर मोठा आहे .अंत्रोळी आणि कंदलगाव मध्ये 50 एकर मध्ये ही जिव्हाळा शेतकी कर्मशाळा आहे. अशी माहितीही राजमाने सर यांनी दिली.
ही बातमी सतत अपडेट होत राहील…