Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

सोलापूर : सोलापुरातील तरुणांनी एकत्र येत भुकेलेल्यांना अन्नदान करून सोमवारी रोटी डे साजरा केला. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन आणि शनी मंदिर परिसरात अन्नदान करण्यात आले.

अभिनेते अमित कल्याणकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी देशभरात रोटी डे साजरा केला जातो. गरजू आणि भुकेलेल्यांना एक वेळचे जेवण देण्याची ही संकल्पना आहे. इको फ्रेंडली क्लबचे सदस्य दरवर्षी या उपक्रमात सहभागी होत असतात. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या आवाहनाला अनेकांनी प्रतिसाद देत चपाती, भाकरी, भाजी आणि अन्य खाद्यपदार्थ इको फ्रेंडली क्लबकडे जमा केले. सोमवारी सकाळी सर्वजण ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसरात एकत्र आले. सुरुवातीला इको फ्रेंडली क्लबचे संस्थापक परशुराम कोकणे यांनी रोटी डे या उपक्रमाची संकल्पना सांगितली. अभिनेते अमित कल्याणकर यांनी सुरू केलेल्या या मोहिमेला आता देशभरातून प्रतिसाद मिळत असून तरुणांचा सहभाग आशादायक असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक मदन पोलके यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन केले आणि सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अभिषेक दुलंगे, ऋचा सातपूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजित कोकणे यांनी सर्वांचे आभार मानले.

यानंतर तरुणांनी वेगवेगळे गट करून ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिर परिसर, रेल्वे स्टेशन आणि शनी मंदिर परिसरात भाजी, भाकरी, चपाती आणि अन्य खाद्यपदार्थांचे वाटप केले.

या उपक्रमात अंबरीश कदम, ऐश्वर्या कदम, आर्यन कवडे, वरदा कुलकर्णी, समर्थ देशपांडे, अथर्व बडवे, सोनाली थिटे, सोहम थिटे, सई कोकाटे, शिवानी वळसंगे, वैष्णवी पुराणिक, अमान अत्तार, शमा शिंदे, भगवान बांगर आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *