मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती हटवण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात होणार आहे. मराठा आरक्षणाच्या स्थगितीपूर्वीच्या नोकरभरतीच्या अंमलबजावणीला परवानगी नाही, असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे. हे प्रकरण गंभीर आहे आणि मोठं आहे त्यामुळे विस्तृत सुनावणी जानेवारी महिन्यात केली जाईल असं या घटनापीठने म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टानं हा निर्णय देत राज्य सरकारला पुन्हा दणका दिला आहे.
या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. आम्ही कोणतीही भरती थांबवण्यास नकार दिलेला नाही, मात्र या अॅक्ट (act) अंतर्गत ही भरती करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलं आहे. आज स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न अपुरे ठरले आहेत. जानेवारीच्या अंतिम आठवड्यात यावर निर्णय घेऊ, असं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. या सुनावणीकडे मराठा समाजाचा लक्ष लागून राहिल होत.
विशेष म्हणजे मराठा समाजातील युवक युवतींमध्ये आरक्षणात स्थगिती मिळाल्यामुळे सरकार विषयी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
Leave a Reply