डिजिटल इंडिया झाल्यापासून भारतीय मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहारासाठी PhonePe, Google Pay, Paytm या थर्ड पार्टी ॲपचा वापर करतात. सर्रास अनेक शॉप व व्यवहारात या ॲप्सचा पेमेंट करण्यासाठी वापर केला जातो. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (National Payments Corporation of India) थर्ड पार्टी ॲप प्रोव्हाडर्सवर 1 जानेवारी 2021 पासून 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारकडून दिलेल्या माहितीनुसार, देशात प्रत्येक महिन्याला जवळपास 200 कोटी UPI ट्रान्झेक्शन होतात. हे UPI ट्रान्झेक्शन विविध पेमेंट्स ॲप्सद्वारे होतात. येणाऱ्या काळात देशात UPI ट्रान्झेक्शनचा आकडा आणखी वाढणार आहे.
दरम्यान, UPI ट्रान्झेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे NPCI थर्ड पार्टी ऍपच्या ट्रान्झेक्शनवर लगाम लावण्याच्या प्रयत्नात आहे. 1 जानेवारीनंतर ॲप, टोटल वॉल्यूमच्या अधिकाधिक 30 टक्केच ट्रान्झेक्शन करू शकतील.
थर्ड पार्टी ॲप्सचे एकाधिकार संपुष्ठात आणण्यासाठी NPCI ने हा निर्णय घेतला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक पत्रक जारी करत सांगितलं की, थर्ड पार्टी ॲप प्रोव्हाडर्सवर 30 टक्के कॅप लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात कोणत्याही थर्ड पार्टी ॲपची मक्तेदारी रोखण्यासाठी आणि त्यांच्या आकारानुसार मिळणारे विशेष फायदे रोखण्यासाठी NPCI ने हा निर्णय घेतला आहे. NPCI च्या या निर्णयामुळे कोणत्याही पेमेंट ॲपची यूपीआय व्यवहारांमध्ये मक्तेदारी राहणार नाही.