Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

आज रोजी सोलापूर शहरातील हॉटेल लोटस येथे पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकासआघाडी चे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ सोलापूर शहरातील महाविकास आघाडीतील सर्व प्रमुख  पक्षाच्या शहर जिल्हा प्रमुखांची तसेच पक्षाच्या नगरसेवकांची महत्वाची नियोजन बैठक पार पडली.

या नियोजन बैठकीत राहिलेल्या चार दिवसात प्रचाराच्या दृष्टिकोनातून सोलापूर शहरातील 11 हजार पेक्षा जास्ती पदवीधर असलेल्या मतदारांना तसेच 3 हजार पेक्षा जास्त शिक्षक मतदार यांना समक्ष भेटून बोलून त्यांना महाविकास आघाडीच्या उमेदवारांना पसंती क्रमांक 1 द्यायला सांगून जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचे ठरविण्यात आले.

प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष श्री.भारत जाधव यांनी तर आभार प्रदर्शन राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष श्री.संतोष पवार यांनी केले.
या नियोजन बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख श्री पुरुषोत्तम बरडे, गटनेते श्री.महेश कोठे, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, शहर प्रमुख गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक – अमोल बापू शिंदे, उमेश गायकवाड, विनायक कोंड्याल, भारतसिंग बडूरवाले, विठ्ठल कोटा, ज्योती सुनील खटके, प्रथमेश कोठे
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक श्री.किसन जाधव, महिला शहराध्यक्ष नगरसेविका सौ.सुनीता रोटे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहर प्रमुख श्री प्रकाश वाले, गटनेते नगरसेवक श्री चेतन नरोटे, नगरसेवक – शिवा बाटलीवाला, बाबा मिस्त्री, तोफिक भाई हत्तुरे, विनोद भोसले, नरसिंग कोळी, फिरदोस पटेल, वैष्णवी करगुळे, प्रवीण निकाळजे, परविन इनामदार, अनुराधा काटकर आदी प्रमुख उपस्थित होते.

या नियोजन बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी आतापर्यंत गेली तीन टर्म भाजपाचा उमेदवार पुणे विभागात शिवसेनेच्या पाठबळावरती निवडून येत होता परंतु या वेळेला शिवसेनाही इतर पक्षा समवेत राज्यात सत्तेत असल्याने आघाडीचा धर्म पाळून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करणारच असे निक्षून सांगितले तर शहर प्रमुख नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी प्रमुख्याने मार्गदर्शन करताना तसेच प्रचाराचे नियोजन कशाप्रकारे अमलात आणायचे याबद्दल सखोल चर्चा केली.
तसेच काँग्रेस शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी वॉर्ड/प्रभाग निहाय यंत्रणा राबविण्या संदर्भात मार्गदर्शन केले व शिवसेना गटनेते नगरसेवक श्री.महेश अण्णा कोठे यांनी डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर कसा करावयाचा याबद्दल मार्गदर्शन केले.


यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना काँग्रेसचे नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी शिक्षक व पदवीधर मतदार निवडणुकीत शिक्षक हे देखील पदवीधर च्या मतदार भूमिकेत असल्याचे नमूद करताना त्यांचे मतदान देखील कसे महत्त्वाचे आहे हे सांगितले.


यावेळी सोलापुरातील पदवीधर  व शिक्षक मतदारसंघ निवडणुकीला महा विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलेले एम आय एम या पक्षाचे नगरसेवक तौफिक शेख यांच्या नेतृत्वात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *