Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

शेखर म्हेञे/ माढा प्रतिनिधी

माढा तालुका व माढा परिसरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनिय काम करणाऱ्या नऊ स्ञी शक्तीचे  प्रसिद्धी  होणार आहेत. यामध्ये आज प्रथम माळ असल्याने माढा नगरीच्या प्रथम नागरीक माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मीनलताई साठे यांच्या कार्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.घरातील कौटुंबिक जबाबदारी स्वीकारत माढा शहर व  परिसरातील गरीब महिलेसह सुशिक्षित वर्गातील महिलांना  एकञ करून समाजकार्याला सुरुवात केली.

प्रियदर्शनी महिला बचत गटाची उभारणी करून महिलांना स्वावलंबी करण्यासाठी व त्यांच्या अडचणी दुर होण्यासाठी त्यांना  अर्थसहाय्य उपलब्ध करून बचत गटाच्या माध्यमातून समाज कार्य करत अनेक गरजू महिलांना त्यांनी सहकार्य करण्याचे काम हाती घेत आपल्या साठे घरण्याचा राजकीय वारसा जपत माढा शहराचे नगराध्यक्ष पद भूषवत आहेत. त्या माध्यमातून माढा शहराचा विकास कामाचा आलेख चांगल्या पद्धतीने उंचवण्यासाठी त्या नेहमी प्रयत्नशील असतात. माढा शहरात अनेक चांगली कामे करत नागरिकांना मुलभूत सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन गावातील रस्ते हाय मॅक्स, इनलाईन गटारी व पाणीपुरवठा आशा विविध कामांमध्ये अग्रेसर राहून माढा शहरातील नागरिकांचे कौतुकाचे शब्द मिळवत आहे.

त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत असताना आपल्या शैक्षणिक गोष्टीकडे देखील दुर्लक्ष न करता  एल. एल. बी ची डिग्री प्राप्त करून वकिल झाल्या व आपल्या यशा मध्ये आणखी एक मानाचा तुरा लावला हे काम करत असताना त्यांना त्यांच्या चांगल्या कामाची पोच पावती म्हणून अनेक संस्थांनी  पुरस्कार सन्मानित केले आहे. त्याच बरोबरीने त्या आपल्या कुटुंबाची देखील काळजी घेण्यात मागे नाहीत घरातील आपली जबाबदारी पार पाडत कुटुंबातील सर्वांच्या काळजी घेत व आपल्या मुला-मुलीच्या शिक्षणाकडे देखील स्वःता  जातीने लक्ष देत त्यांच्या शैक्षणिक जीवनात   उल्लेखनीय कामगिरीसाठी नेहमी प्रयत्नशील असतात.  त्यामुळे माढा शहरांमध्ये महिलेबरोबर इतर लोकांमध्ये त्यांचे एक प्रेरणादायी स्ञी म्हणून आदराचे  स्थान निर्माण झाले आहे. त्याच बरोबर ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देत असताना एक महिला काय करू शकते या संदर्भातील त्यांनी अजून एक गोष्ट म्हणजे त्या धार्मिक वृत्तीच्या तर आहेतच पण अंधश्रद्धेला नेहमी त्याने फाटा देऊन समाज्यातील चुकीच्या गोष्टी करणार्याना आळा घातला आहे.

प्रियदर्शनी बचत गटाच्या माध्यमातून दरवर्षी माढा शहराचे अराध्य दैवत श्री माढेश्वरी देवी मंदिरातील नवरात्र उत्सव यावेळी मंदिरातील साफसफाई करून मंदिर परिसरात स्वच्छता राखन्या बरोबर भाविकांकडून  काही चुकीच्या रुढी केल्या जात होत्या त्या बंद केल्या आणि त्या भाविकांना देखील रूजल्या त्यामुळे मंदिर परिसरात स्वच्छता राखून नवरात्र उत्सव उत्साहात साजरा करण्यास प्रेरणा निर्माण होतो. त्या बरोबर आपल्या घरातील शेती व्यवसाय देखील त्या लक्ष देतात त्यामुळे स्त्री शक्तीने आपल्या मनात आणले तर कुठल्याही चांगल्या काम आपल्या जीवनात  कष्ट  करून मिनलताई साठे सारखं नावलौकिक मिळवणं शक्य असणार आहे.

राजकारणात असुनही समाजकारणाचा वारसा हा मला दोन्ही घराकडुन लाभला आहे राजकारण हे समाजकार्यचे चांगले माध्यम आहे हे डोळ्या समोर ठेवूनच सर्व क्षेत्रात मी श्रध्दा व इच्छाशक्ती ठेऊन काम करते, मग ते कौटुंबिक, सामाजिक, राजकीय, किंवा शैक्षणिक क्षेत्रातील असो  त्यामुळे यश प्राप्त होते. त्यासाठी महिलांनी नवदुर्गा रूप धारण करून आलेल्या संकटावर मात करावी. कारण महिलेला नेहमीच अनेक भुमिका पार पाडाव्या लागतात .

मिनल साठे
नगराध्यक्षा, माढा नगरपंचायत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *