मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना अंतर्गत महाराष्ट्र शासन विभागाच्यावतीने महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करणाऱ्या संरक्षण दलाच्या सेवेतील माजी सैनिकांना देशासाठी प्राणाची बाजी लावून देशाचे संरक्षणाचे केलेले कार्य विचारात घेऊन नगरविकास विभागाने शासन निर्णयाद्वारे राज्यातील नागरी स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने शहर हद्दीती एकूण जवळपास 1700 माजी सैनिक रहातात त्यापैकी 200 जणांनी महापालिकेकडे अर्ज सादर केला आहे उर्वरित माजी सैनिकांनी आपली मालमत्ता कर सवलतीसाठी तमाम माजी सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवा पत्नींना जाहीर आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी त्यांच्या नावे असलेले एका मालमत्तेच्या कर सवलतीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय सोलापूर यांच्याकडून पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करून पुढील 12 दिवसाच्या आत 24 फेब्रुवारी पर्यत सोलापूर महानगरपालिकेकडे सादर करावे जेणेकरून पात्र माजी सैनिक आणि माजी सैनिकांचे विधवा पत्नींना मालमत्ता कर सवलती देणे सुलभ होईल असे आव्हान महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केले.
योजनेच्या लाभ मिळवण्यासाठी सदर माजी सैनिक महाराष्ट्र राज्यात जन्मलेला असावा किंवा महाराष्ट्र राज्याचा किमान पंधरा वर्षे सलग रहिवासी असावा त्याकरिता त्याने सक्षम अधिकाऱ्याना कडून अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. अशा करमाफीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्या कडून प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. पात्र व्यक्ती राज्यातील एकाच मालमत्ते करिता करमाफिस पात्र राहतील त्याबाबतचे घोषणा पत्र त्यांनी संबंधित जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांना सादर करणे आवश्यक राहतील. या योजनेचा लाभ संबंधित माजी सैनिक व त्यांच्या पत्नी/ विधवा हयात असेपर्यंत राहतील तसेच अविवाहित शहीद सैनिकांच्या बाबतीत त्यांचे आई वडील हयात असेपर्यंत हे लाभ देय राहतील. तसेच सोलापूर महानगर पालिकेच्या वतीने ही योजना राबवण्यात येत असून आयुक्त पी.शिवशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त कर संकलन विभाग जमीर लेंगरेकर तसेच करसंकलन सहाय्यक आयुक्त श्रीराम पवार यांच्या अधिपत्याखाली ही योजना राबविण्यात येत आहे.
Leave a Reply