शेखर म्हेञे /माढा प्रतिनिधी:
माढा शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकात संग्राम मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्यावतीने अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची 391वी जयंती मोठ्या उत्साहात व पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घातलेल्या नियम व अटी ची पूर्तता करत मंडळाच्यावतीने मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा ॲड.मीनल साठे माढा तालुका पंचायत समितीचे सभापती विक्रमसिंह शिंदे ,शिवसेना जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजारनाना भांगे, नगरसेवक शहाजी साठे नगरसेवक सुभाषदादा जाधव, सोलापूर दुध संघांचे माजी संचालक राजाभाऊ चवरे, विरोधी पक्षनेते चंद्रशेखर गोटे, माजी ग्रामपंचायत सदस्य गुरूराज कानडे, येरवडा जेल आधिकारी सोमनाथ मस्के, माढा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमुल कादबाने, मंडळाचे बाबा मस्के व आदी शिवप्रेमीच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले मंडळाच्यावतीने यावेळी मिरवणूक व डाॅल्बी या गोष्टींना फाटा देत महिलांचे आरोग्य तपासणी, रक्तदान शिबिर , शालेय लहान मुलांची भाषणे, गायन व संध्याकाळी महिलांचे हाळदी कुंकू बरोबर छञपती शिवाजी महाराजांच्या पाळणा म्हणण्याचा कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मंडळाकडे वर्गणीच्या माध्यमातून राहिलेल्या रक्कमेतून माढ्यातील शालेय गरीब विद्यार्थ्यांना पुढील काळात शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याने एका आगळ्या वेगवेगळ्या शिवजयंतीचा आदर्श संग्राम मध्यवर्ती मंडळाच्या वतीने समाजापुढे ठेवण्यात आला आहे. यावेळेस माढा शहरातील सर्व स्तरातील शिवभक्त,नागरिक, व मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Leave a Reply