मी राजीनामा दिलेला नाही आणि भाजप पक्ष सोडलेला नाही;एकनाथ खडसे

भारतीय जनता पार्टीवर गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे नाराज आहेत. त्यांनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली होती. जळगावात गेल्या काही दिवसांपासून घटस्थापनेच्या दिवशी एकनाथ खडसे भाजपा सोडणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. एकनाथ खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्याच्या चर्चा आणि वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलं होतं. मात्र एकनाथ खडसे यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत मी भाजपा हा पक्ष सोडलेला नाही असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

भाजप हा माझा पक्ष आहे, मी भाजप पक्ष सोडलेला नाही आणि राजीनामाही दिला नाही असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.