Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. पनवेलजवळ झालेल्या या भीषण अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला असून 16 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमींवर नवी मुंबईच्या कामोठे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एसटी बस साताऱ्याहून मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला आहे. या अपघातात एसटीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बसमधील आसन व्यवस्था तसेच एका बाजूचा बसचा पत्रा पूर्णपणे निखळला आहे. वाहतूक पोलिसांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. जखमींवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये 16 जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. या सर्व जखमींना तात्काळ IRB यत्रंणा, महामार्ग वाहतूक पोलीस पळस्पे टँप यांनी MGM रुग्णालयात दाखल केले आहे. या सर्व जखमींवर कामोठेतील MGM रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान हा अपघात नेमका कसा झाला, याची अद्याप माहिती मिळालेली नाही. या अपघातातील जखमींवर पनवेल आगार प्रमुख विलास गावडे आणि इतर पनवेल डेपोतील अधिकारी वर्ग रुग्णालयात उपस्थित आहे. हे सर्व जण जखमीची काळजी घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *