Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

मुंबई 2022 मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल, यासाठी शिवसेनेशी युती ची गरज नाही, असे मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी म्हटले आहे. पण सध्या काँग्रेस आणि शिवसेना राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा भाग आहे.
यापूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकासआघाडी म्हणूनच लढवेल असे संकेत दिले आहे. मात्र, महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी आपल्यालाच प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यात होणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र येऊन लढवतात का? हे पहावे लागणार आहे. स्थानिक राजकारणाबाबत बोलायचे झाल्यास मुंबई महापालिकेतील काँग्रेसमध्ये शिवसेनेबद्दल काहीशी नाराजी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *