आज रोजी 26 जानेवारी भारताचा ७२ वा प्रजासत्ताक दिन,
या राष्ट्रीय दिनाच्या औचित्याने सोलापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयात सकाळी 8.30 वाजता शहराध्यक्ष श्री.भारत जाधव यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम शहर कार्याध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तसेच प्रदेश संघटक सचिव शंकर पाटील, प्रांतिक सदस्य व माजी महापौर मनोहर सपाटे, प्रांतिक सदस्य रामभाऊ साठे, वरिष्ठ नेते व माजी उपमहापौर पद्माकर नाना काळे, परिवहन समिती माजी सभापती राजन भाऊ जाधव, ज्येष्ठ नेते काय्युम शेख, महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे आदी मान्यवरांच्या हजेरीत उत्साहात पार पडला. राष्ट्रीय ध्वज फडकविल्यानंतर राष्ट्रगीत तसेच वंदे मातरम गीत गाऊन ध्वजाला सर्वांतर्फे सलामी देण्यात आली.
राष्ट्रवादी सेवादलाचे प्रदेश सचिव सिकंदर गोलंदाज तसेच शहराध्यक्ष चंद्रकांत पवार यांनी अत्यंत नीटनेटके पणाने आयोजन केलेल्या या राष्ट्रीय कार्यक्रमाला सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फ्रंटल अध्यक्ष तसेच सर्व सेलचे शहराध्यक्ष, महिला, युवती व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ध्वज वंदन कार्यक्रमानंतर सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.