Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

मुंबई,दि.4 : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे.
अन्वय नाईक यांची मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाची कंपनी होती. मे 2018  अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्यांच्या खिश्यात एक सुसाईट नोट आढळून आली होती. त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले  पैसे थकविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद केले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्महत्येत प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी अलिबाग पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे.. वास्तुविशारद अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. गोस्वामी यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे.

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर उद्योग जगत चांगलेच हादरून गेले आहे. नाईक यांच्या सुसाईड नोटमध्ये रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांची नावे समोर आल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. रायगड पोलिसांसाठी आता ही हायप्रोफाईल केस झाल्यामुळे त्यांनी अन्वय यांच्या कॉनकॉर्ड डिझायनर कंपनीच्या विविध कार्यालयांची तपासणी सुरू केली आहे. त्यानुसार अहवाल आल्यानंतरच तपासाची पुढील दिशा मिळण्यास मदत होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


पोलिसांकडे कोणतीही कागदपत्रं, कोर्टाचा आदेश किंवा समन्स नसतानाही ही कारवाई केला जात असल्याचा आरोप रिपब्लिककडून करण्यात आला आहे. याशिवाय अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांकडून जबरदस्ती करत धक्काबुक्की करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला आहे. पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन अलिबागला रवाना झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *