Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

 

सोलापूर, दि.13- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेज सेंटरसाठी राज्य शासनाकडून एक कोटी अनुदान मंजूर पैकी 25 लाखांचा पहिला हप्ता जमा झाल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.

उद्योजक पिढी घडण्यासाठी तसेच नवोपक्रम आणि उद्यमशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राज्य शासनाकडून इनक्युबेशन सेंटर सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटर येथे सुरू होऊन त्याविषयी कार्य चालू झाले. उद्योजकता मार्गदर्शन शिबिर, उद्योजकता प्रदर्शनबरोबरच विविध उपक्रम या सेंटरकडून राबविण्यात येत आहेत. हॅन्डलूम युनिट, ॲग्रो टुरिझम सेंटर, चरखा, सोलर चरखा, हर्बेरियम अशा नावीन्यपूर्ण प्रकल्पात तरुणांना सक्षम बनवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

राज्यशासनाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड लिंकेज सेंटरला पाच वर्षांसाठी 5 कोटी रुपये अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक वर्षासाठी एक रुपये अनुदानाची तरतूद झाली आहे. त्यापैकी पहिला हप्ता 25 लाखाचा विद्यापीठास प्राप्त झाला आहे. आता या अनुदानामधील रक्कम उद्योजक पिढी घडण्यासाठी युवकांना प्रोत्साहन देण्यात येणार असल्याचे कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी सांगितले. प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील यांनी सध्या या विभागाचे काम पाहत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *