विलोभनीय | श्रीस्वामी समर्थ मंदिरात गुरूप्रतिपदेनिमीत्त फुलांची सजावट

प्रतिनिधी (अक्कलकोट) – दि.२८ फेब्रुवारी – येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात साजरा होणारा श्री गुरूप्रतिपदा उत्सव हा एक महत्वाचा उत्सव आहे.आज गुरूप्रतिपदेनिमीत्त येथील वटवृक्ष मंदीरास विविधरंगी आकर्षक फुलांची सजावट पुणे येथील स्वामी भक्त वासुदेव पंडीत यांच्या मार्फत करण्यात आली असल्याचे स्पष्टीकरण मंदीर समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी केले.

याप्रसंगी बोलताना वासुदेव पंडीत यांनी मी एक सर्वसामान्य फुलांचा व्यवसायिक व स्वामींचा निस्सिम भक्त आहे. कोरोनाच्या पाश्र्वभुमीवर मंदीर चालू अथवा बंद असण्याची शास्वती नसताना गुरूप्रतिपदेच्या मुहूर्तावर स्वामी भक्तीच्या माध्यमातून मला वटवृक्ष मंदीरास फुलांची सजावट करण्याची इच्छा पुर्ण करण्याची मंदीर समितीने संघी दिल्याबद्दल मी मंदीर समितीचा ऋणी आहे.

या सेवेत मला पुणे येथील सहकारी व कॉसमॉस बँकेचे संस्थापक मिलींद पोफळे, पुंडलिक हगवणे, राजेंद्र थोपटे, बाबूराव चव्हाण, तुळशीदास गोसावी, विजय लाड, प्रशांत पवार, गणेश भानकुटे, दिपक चव्हाण, प्रशांत दिघे आदींचे सहकार्य लाभले असल्याचे सांगीतले.

आकर्षक अशा या फुलांच्या सजावटीने वटवृक्ष मंदीराचे दृष्य अत्यंत विलोभनीय दिसत असून या नयनरम्य सजावटीने व स्वामी दर्शनाने येणाऱ्या स्वामी भक्तांचे आनंद व त्यांच्या चेहऱ्यावरिल समाधान द्विगुणीत झाल्याचे दिसत होते.