Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोलापूर महापालिका आयुक्तांनी आदेश लागू केले आहेत. त्यानुसार महापालिका क्षेत्रातील भाजी विक्रेते ,दुकानदार, फळ विक्रेते यांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्र असणाऱ्या ठिकाणी त्या त्या भागातील भाजीविक्रेते, दुकानदार, फळविक्रेते यांची कोरोना टेस्ट घेण्यात येत आहे.

सोलापूर शहरात आज रविवारी दि.1 नोव्हेंबर रोजी कोरोनाचे नवे 40 रुग्ण आढळले असून यामध्ये 18 पुरुष तर 22 स्त्रियांचा समावेश आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 33 इतकी आहे. यामध्ये 15 पुरुष तर 18 महिलांचा समावेश होतो.

आज रविवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 1385 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 1345 निगेटीव्ह तर 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज कोरोनाने एक मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

बाधित व्यक्ती…
सात रस्ता ,अशोक नगर, विजापूर रोड, जानकी नगर आसरा, उत्तर कसबा चौपाड ,सर्वोदय हाइट्स वसंत विहार ,पाटील नगर सैफुल, सदिच्छा नगर ,हिंदुस्तान शाळेजवळ सात रस्ता ,संतोष नगर जुळे सोलापूर ,आनंद नगर विजापूर रोड,

आयकर नगर रंगभवन, नवोदय नगर होटगी रोड, बाल शिवयोगी नगर कुमठा नाका, एक नंबर झोपडपट्टी विजापूर रोड, अवसे वस्ती आमराई, दमाणी नगर ,द्वारका नगर विजापूर रोड ,गोकुळधाम जवळ जुळे सोलापुर, अशोक चौक पाच्छा पेठ ,कृष्णा नगर सैफुल, आदित्य नगर ,युनायटेड रेसिडेन्सी रेल्वेलाईन, हेरिटेज अपार्टमेंट दक्षिण सदर बाजार, संगमेश्वर कॉलेज मागे रेलवे लाईन्स, सिद्धेश्वर पेठ, दक्षिण कसबा आणि शिवगंगा नगर या परिसरातील व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

कोरोनाने मृत्यू….

शहरातील 64 वर्षीय महिला ज्या गरीबी हटाव झोपडपट्टी नंबर 2 विजापूर नाका परिसरात राहत होत्या. त्यांना 26 ऑक्टोबर रोजी युनिक हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी टेस्ट केल्यानंतर त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान 30 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी आठ वाजता त्यांचे निधन झाले. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9612 असून एकूण मृतांची संख्या 535 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 456 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 8621 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *