जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सोलापूर अंतर्गत शासकीय मैदान नेहरु नगर, विजापूर रोड येथे अत्याधुनिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे आठ लेनचे 400 मी धावण मार्गाचे काम सोलापूरातील आंतरराष्ट्रीय मानांकित प्राप्त प्रिसिजन फौंडेशनचे मा.श्री. यतिन शहा यांच्या सेस फंडातुन करण्यात येत आहे. त्या कामाचे उद्घाटन स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी श्री. त्र्यंबक ढेंगळे-पाटील, म.न.पा. उपायुक्त मा.श्री. धनराज पांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर यांच्या शुभ हस्ते कुदळ मारुन करण्यात आले. या मैदानावर प्रिसिजनच्या वतीने जुन्या इमारतीचे बळकटीकरण करुन त्यास रंग रंगोटी करण्यात येणार आहे. तसेच महानगरपालिकेच्या वतीने मैदानावर खेळाडूंसाठी व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वच्छतागृह व मैदानाच्या कडेने दिवा बत्तीची सोय व लॉन इत्यादी कामे नगरसेवक श्री. प्रभाकर जामगुंडे यांच्या प्रयत्नातुन करण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय मैदान नेहरु नगर येथे राज्य व राष्ट्रीय स्पर्धा घेणे सोईचे होईल व आपल्या सोलापूरातील ॲथलेटिक्स खेळाडूंना त्याचा फायदा होईल. अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांनी दिली.
उपरोक्त कामाच्या शुभारंभाच्या प्रसंगी स्मार्ट सिटीचे मुख्याधिकारी श्री. त्र्यंबक ढेंगळे-पाटील, म.न.पा. उपायुक्त मा.श्री. धनराज पांडे, संचारचे उपसंपादक श्री. प्रशांत जोशी, ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री. सुरेश पवार, प्रिसिजन फौंडेशनच्या वतीने मोहसीन आत्तार ( कंत्राटदार ) तसेच जॉगर्स क्लबचे अध्यक्ष श्री. कांबळे,धनशेट्टी मामा, शाबादे, प्रशांत जामगुंडे, शासकीय मैदान नेहरु नगरचे प्रमुख शासकीय राज्य क्रीडा मार्गदर्शक सत्येन जाधव, मैदान सेवक नागेश सोनटक्के, राष्ट्रीय खेळाडू रवि राठोड, सुनिल जाधव, विशाल करजकर इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नितीन तारळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्येन जाधव, क्रीडा मार्गदर्शक यांनी केले.