पुणे विभाग शिक्षक विधानपरिषद मतदारसंघाच्या ईच्छुक उमेदवार माढा तालुक्यात हितगुज दौरा
मागील अनेक वर्षांपासून राज्यातील हजारो विनाअनुदानित व अनुदानित शाळांमधील शिक्षकांचे अनेक प्रश्न व मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून त्या सोडविण्यासाठी मी भविष्यात प्रयत्न करणार असल्याचे पुणे विभाग शिक्षक विधानपरिषद मतदार संघाच्या ईच्छुक उमेदवार रेखा दिनकर पाटील यांनी सांगितले आहे.
त्या मानेगाव ता.माढा येथील संजीवनी माध्यमिक विद्यालयात शिक्षकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजिवनी विद्यालयाचे मुख्याध्यापक विकास रणपिसे होते.
प्रास्ताविक सोलापूरचे इंग्रजी विषयाचे तज्ञ मार्गदर्शक शहाजी ठोंबरे यांनी केले.
पुढे बोलताना रेखा पाटील म्हणाल्या की, सध्या राज्यातील अनेक शाळांना अनुदान नाही तसेच टप्पा अनुदानावर असलेल्या शाळांना वेळेवर वाढीव टप्पा मिळत नाही तसेच 2005 पूर्वीच्या व नंतर सेवेत रुजू झालेल्या परंतु 100 टक्के अनुदान नसलेल्या शिक्षकांना जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही तसेच अनेक वर्षांपासून नियमित शिक्षक भरती प्रक्रिया थांबली आहे,शिक्षकांचे मेडिकल बिल व पीएफ संदर्भातील अनेक प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत त्यामुळे हे अत्यंत महत्त्वाचे व शिक्षकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आगामी शिक्षक विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सहशिक्षक विकास मोहळे यांनी केले.आभार अनिल भांगे यांनी मानले.
याप्रसंगी सोलापूरचे प्राचार्य दत्तात्रय गाजरे,मुख्याध्यापक महादेव सुरवसे, दाजी कवले,मुख्याध्यापक औदुंबर चव्हाण,अमोल चव्हाण,योगेश दळवे, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड,मारुती शिंदे, विलास शिंदे,फैय्याज मुलाणी,दत्तात्रय माने,रतिलाल डोंगरे,सुनिल चौगुले, तुकाराम कापसे,शिवाजी भोगे, नारायण मगर,कल्याण मोटे,धनाजी नागटिळक,सुनील खोल,महेश नागटिळक,सुनील गोसावी,सचिन क्षीरसागर,प्रविण क्षीरसागर,सचिन पवार यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.