Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

सोलापूर(प्रतिनिधी) दि.२३नोव्हेंबर आज सोलापूर बाजार समीतीमध्ये शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थकलेली बीले वसूल करण्यासाठी गाळा नं ८८ ला टाळे ठोकून आंदोलन करताच बाजार समीती व गाळा मालक रेवनसिध्द आवजे यांनी आंदोलन स्थळी धाव घेतली आणि शेतकऱ्यांच्या थकलेल्या रकमा रोखीने दिल्यानंतरच आंदोलन थांबवून ठोकलेले टाळे काढण्यात आले. बाजार समीतीचे सचिव श्री.बिराजदार यांना मागण्यांचे निवेद देण्यात आले त्यावेळी शेतकरी संघटनेचे शंकर गायकवाड यांनी बाजार समीतीमध्ये अनेक आडते शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देत नसल्याचे सांगून आणखी असा कोणता आडत्या आढळून आल्यास त्याची टक्कल करून गाढवावरून मिरवणूक काढली जाईल असा खणखणीत इशाराही गायकवाड यांनी यावेळी दिला.

त्यावेळी शेतकरी संघटनेचे शरद भालेकर, सचिन आगलावे, प्रविण उघडे, पिंटू कोळी, अमर पाटील, रोहन जाधव, आण्णासाहेब पांगरे, रोहीत देशमुख आदींसह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *