Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

कोरोनामुळे सर्व धार्मिक कार्यक्रम व पालखी सोहळा रद्द

(प्रतिनिधी अक्कलकोट)   कोरोना संसर्गाच्या पाश्वभुमीवर अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान असलेल्या श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात मंगळवारी श्री दत्त जयंती निमीत्त श्री दत्त जन्मोत्सव भक्ती भावाने व अत्यंत साध्या पद्धतीने संपन्न झाला.

पहाटे ५ वाजता मंगलमय वातावरणात देवस्थानचे पुरोहित मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते व मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांच्या उपस्थितीत श्रींची काकडआरती करण्यात आली. सकाळी १० : ३० वाजता देवस्थानात श्रींचा नैवेद्य आरती सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला. दुपारी ४ ते ५:३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्ता सौ. उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली  दत्त जन्म आख्यान झाले. यानंतर दत्त नामजप व सायंकाळी ६ वाजता पुरोहित मोहन पुजारी व मंदार महाराज यांच्या हस्ते पाळणा पूजन व दत्त जन्मोत्सव आणि मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते आरती होऊन मोजके सेवेकरी व विश्वस्त पदाधिकारी यांच्या उपस्थितीत श्री दत्त जन्म सोहळा श्रींच्या गाभारा मंडपात संपन्न झाला. या प्रसंगी कोणत्याही भाविकांचा यात सहभाग नव्हता. प्रतिवर्षी दत्त जयंती निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या भाविकांना यंदा कोरोनामुळे सामुहिक संपर्क टाळण्याकरीता येण्यास मनाई करण्यात आली. तसेच उद्या सायंकाळी अक्कलकोट शहरातुन निघणारा पालखी सोहळा व वर्षाखेर व नुतन वर्षाचे धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याची माहिती मंदीर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी दिली. यावेळी देवस्थानचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संजय पवार, स्वामीनाथ लोणारी, गिरीश पवार, श्रीशैल गवंडी,  विपूल जाधव, अविनाश क्षीरसागर इत्यादी उपस्थित होते. दत्त जयंती निमीत्त मंदीर बंद असल्याने पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते व अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिक्षक डॉ. संतोष गायकवाड, अक्कलकोट नॉर्थ पोलीस ठाण्याचे पी.आय. कलप्पा पुजारी यांनी चोख बंदोबस्त व वाहतुकीचे नियोजन केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *