Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

 

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज रविवारी दि.6 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 462 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 275 पुरुष तर 187 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 162 आहे. आज 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आज एकूण 3853 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3391 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 13 हजार 672 इतकी झाली आहे. यामध्ये 8326 पुरुष तर 5346 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे तर आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 395 जणांचा मृत्यू झाला आहे यात 272 पुरुष तर 123 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 3 हजार 983 आहे .यामध्ये 2 हजार 530 पुरुष तर 1453 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 9 हजार 294 यामध्ये 5524 पुरुष तर 3770 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -0

बार्शी – 76

करमाळा – 34

माढा – 109

माळशिरस – 58

मंगळवेढा – 15

मोहोळ – 14

उत्तर सोलापूर – 4

पंढरपूर – 87

सांगोला – 51

दक्षिण सोलापूर – 14

एकूण 462  कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *