काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष सातलिंगप्पा म्हेत्रे यांच्या जयंतीनिमित्त शनिवार,21 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता श्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे प्रशाला येथे रक्तदान शिबिर व मोफत कराटे प्रशिक्षण नाव नोंदणीचा शुभारंभ होणार असल्याची माहिती श्री जागृत महादेव सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष महेश स्वामी यांनी दिली.
श्री जागृत महादेव सामाजिक बहुउद्देशीय संस्था, दुधनी यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ष. ब्र.चन्नमलेश्वरमलेश्वर महास्वामीजी (बडदाळ) हे भूषविणार आहेत.व म.नि.प्र. डॉ. शांतलिंगेश्वर महास्वामीजी (दुधनी) यांच्या दिव्य सान्निध्यात रक्तदान शिबिर मोफत कराटे प्रशिक्षण नाव नोंदणी शुभारंभ पार पडणार आहे. यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर मेत्रे, मातोश्री लक्ष्मी शुगर चे कार्यकारी संचालक शिवराज मेत्रे, जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी, नगरसेवक, सरपंच आदी उपस्थित राहणार आहेत.