Latest Post

Рейтинг Букмекеров Рейтинг Букмекерских Контор%3A Лучшие Букмекерские Конторы 2024 Онлайн подробный Сайтов Бк отзыва Пользователе Ücretsiz Casinos Oyunları

सोलापूर : कोरोनामुळे व्यायामशाळा, तालीम, मैदाने बंद असल्याने स्वत:ला फिट राखण्यासाठी लोक सायकलीचा वापर करू लागले आहेत. पर्यावरणपूरक, आरोग्यवर्धक, इंधनबचत करणारा पर्याय म्हणून पाहिल्या जाणार्‍या सायकलींना पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. तरूणाईपासून ते आबालवृद्धांपर्यंत सायकलची क्रेझ वाढत आहे. मधली काही वर्ष तरुणाईच्या आयुष्यातून सायकल हद्दपार झाली होती. पण आता अचानक जबरदस्त वेगानं सायकल त्यांच्या आयुष्यात परत आली आहे.

गरिबीचे लक्षण मानले गेलेल्या सायकलकडे सध्या श्रीमंतीचे प्रतीक म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. व्यायाम आणि इंधनबचतीच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांपासून ते युवक, युवती, महिला आणि ज्येष्ठ मंडळीही सायकलची रपेट मारताना नजरेस पडतात. या शहरालगतच्या महामार्गावर सकाळी अनेक जण सायकलवर रपेट मारताना दिसून येत आहेत. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी काही सायकलप्रेमी सायकलिंग करताना दिसून येत असतात.

आजही तीन-चार हजारात मिळणारी आणि ‘आयुष्यभर’ चालणारी ही सायकल आता जवळपास हद्दपार झाली असली तरी नव्या रुपातील ‘गिअर्ड’ सायकलींनी तरुणांच्या आयुष्यावर गारूड केलं आहे. या सायकली त्यांना त्यांच्या जीवापेक्षाही प्यार्‍या झाल्या आहेत. सायकल क्षेत्रातही नवनवीन कल्पना आणि रचनांचे वारे वाहू लागले असून, रटाळ सांगाड्याचा लुक काळानुरूप बदलत आहे. जाड टायर, अगदी सडपातळ टायर, गियर, बॅटरी, डायनामो आणि तत्सम विविध सुविधायुक्त सायकली बाजारात दाखल झाल्या आहेत.

फिटनेससाठी सायकलचा वापर 

कोरोना काळात सायकलींगकडे मोठा कल दिसत आहे. परिणामी नवीन सायकली खरेदीकडे कल वाढला आहे. साधारणत: तीन हजारापासून ते सोळा हजारापर्यंत सायकल विकत घेतली जाते. काही सायकलींची किंमत लाखाचा घरात आहे. लोक फिटनेससाठी सायकलचा वापर करत आहेत.
मागील वर्षापेक्षा यावर्षी सायकलची मागणी वाढली आहे.

नितेश भंडारे
मदनलाल ब्रदर्स, सायकल विक्रेते

 

फॅन्सी सायकलींना मागणी 

फॅन्सी सायकलीची किंमत ही आठ हजारापासून ते वीस हजारापर्यंत विक्री केली जाते. याशिवाय तरुणांमध्ये गिअर सायकलींची मागणीही वाढली आहे. गिअरसायकलीमध्ये शॉकअप विथ गिअर याही सायकली मुलांना आकर्षित करीत आहेत. गिअरच्या सायकलींमध्ये सहा गिअरपासून ते अठरा गिअरपर्यंतच्या सायकली उपलब्ध आहेत.

महेश पवार
किसान सायकल मार्ट, सायकल विक्रेते,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *