सोलापूर केगाव येथील एन बी नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग केगाव सोलापूर मध्ये सोलापूर जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले स्वतंत्र नियमावली व आदेशाचे पालन करून मास्क व सोशल डिस्टन्स व covid-19 च्या नियमांचे पालन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला कॉलेजचे प्राचार्य डॉ. शंकर नवले यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यक्रमास सिंहगड कॉलेजचे प्राचार्य डॉ.शंकर नवले, उपप्राचार्य व विभाग प्रमुख मेकॅनिकल इंजिनिअरिंग डॉ. आर टी व्यवहारे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा.आर बी घारसे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थित शिवाजी महाराजांची ३९१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली