सोलापूर : सोलापूर ग्रामीण तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे हगलुर ता.उत्तर सोलापूर या गावाच्या शिवारात, सोलापूर – तुळजापूर हायवे रोडवरील विराज हॉटेल व लॉजिंग याठिकाणी बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालु असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरुन दि.२८ / ११ / २०२० रोजी ०४.३० वा. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच सोलापूर ग्रामीण, तालुका पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व कर्मचारी असे संयुक्तपणे सदर ठिकाणी छापा टाकण्याकरिता सापळा रचून विराज हॉटेल या ठिकाणी बोगस ग्राहक पाठवून बातमीची खात्री करुन ०५.३० वा छापा टाकण्यात आला.
यातील आरोपी १ ) नितीन बाबूराव ढोणे २ ) हॉटेल मालक महेश रमेश थिटे रा मु.पो.पीर टाकळी ता.मोहोळ जिल्हा सोलापूर यांनी पिडीत महिला हिची शारीरिक पिळवणूक करुन तिस वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेवून तिचे कमाईवर स्वत: ची उपजिविका करीत असताना मिळून आल्याने सदर आरोपीविरुध्द तालुका पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण गुरनं.७२७ / २०२० अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा १ ९ ५६ चे कलम ३,४,५ व ६ सह भादविसंक. ३७० ( १ ) ( २ ) ( ३ ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक / सुहास जगताप, तालुका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण हे करित आहेत. पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर व सोलापूर ग्रामीण या भागात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुंटणखान्यावर अशाच पध्दतीने यापुढेही अनैतिक मानवी वाहतुक प्रतिंबध कक्ष, सोलापूर शहर यांच्याकडून कारवाई करण्यात येणार असून शहरातील व ग्रामीण भागातील बेकायदेशीरपणे चालणारे कुंटनखाने बंद करण्याचा प्रयत्न करण्यात येईल.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व पोलीस उप – आयुक्त ( गुन्हे / विशा ) बापू बांगर तसेच सहा – पोलीस आयुक्त ( गुन्हे ) अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोनि / बजरंग साळुखे , सोलापूर ग्रामीण तालुका पोलीस ठाणे कडील मसपोनि / तावरे, व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोसई / प्रशांत क्षिरसागर , पोहेकॉ / ११४२ बंडगर , पोना / ८४६ बंडगर , मपोना / ६३ ९ गवळी , मपोना / ६ ९ ५ ईनामदार , मपोना / ९२९ मुजावर , मपोशि / १४३९ मंडलिक , मपोशि / १५९१ भुजबळ व चालक पोशि / ७२४ गोरे तसेच , सहा.फौ / एच.एस.जाधव, मपोशि / १८७१ वाघचवरे नेम – तालुका पोलीस ठाणे सोलापूर ग्रामिण असे संयुक्तपणे उत्कृष्ट व शिताफिने कामगीरी करून सदरचा छापा यशस्वी केला.