सोलापूर शहर हद्दीत आज रविवारी दि.27 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 48 रुग्ण आढळले असून यामध्ये 28 पुरुष तर 20 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 137 इतकी आहे. यामध्ये 42
पुरुष तर 95 महिलांचा समावेश होतो.
आज रविवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 395 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 347 निगेटीव्ह तर 48 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज कोरोनाने मृत्यू झाला नसल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8299 असून एकूण मृतांची संख्या 467 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 881 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 6951 इतकी आहे.