सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग हळूहळू वाढत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आज 614 टेस्टिंग अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये 68 जण बाधित असल्याचे आढळून आले आहे.टेस्टिंग कमी असल्याने पॉझिटिव्ह रिपोर्ट कमी येत असल्याचं दिसून येत आहे. परंतु साधारणपणे पाचशेच्या वर टेस्टिंग गेल्यास संसर्गित व्यक्तींची संख्या जास्त दिसून येतेय.
सोलापूर शहर हद्दीत आज शुक्रवारी दि.25 सप्टेंबर रोजी कोरोनाचे 68 रुग्ण आढळले असून यामध्ये 52 पुरुष तर 16 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 82 इतकी आहे. यामध्ये 70
पुरुष तर 12 महिलांचा समावेश होतो.
आज शुक्रवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 614 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 544 निगेटीव्ह तर 68 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज एक जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.
शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8185 असून एकूण मृतांची संख्या 466 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 976 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 6743 इतकी आहे.