Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

MH13News Network

सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. विशेष म्हणजे मृत्यूचे प्रमाण सुद्धा जास्त दिसून येत आहे.आज मंगळवारी दि.22 सप्टेंबर रोजी ग्रामीण भागातील तब्बल 357 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 231 पुरुष तर 126 महिलांचा समावेश होतो.

आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 269 आहे. आज 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. यात 12 पुरुषांचा आणि 3 महिलांचा समावेश होतोय.

आज एकूण 2780 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 2423 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आज पर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 21 हजार 713 इतकी झाली आहे. यामध्ये 13,394 पुरुष तर 8319 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

आज पर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 602 जणांचा मृत्यू झाला आहे यात 417 पुरुष तर 185 महिलांचा समावेश होतोय.

जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 6 हजार 940 आहे .यामध्ये 4 हजार 491 पुरुष तर 2449 महिलांचा समावेश होतो.

आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 14 हजार 171 यामध्ये 8483 पुरुष तर 5688 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 10 तर ग्रामीण 0

बार्शी –नागरी 22 तर ग्रामीण 8

करमाळा –नागरी 18 ग्रामीण 39

माढा – नागरी 4 तर ग्रामीण 11

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 133

मंगळवेढा – नागरी 0 ,ग्रामीण 1

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 6

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

पंढरपूर – नागरी 9 ग्रामीण 19

सांगोला – नागरी 32 ग्रामीण 40

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 5

आजच्या नोंदी नुसार नागरी -95 तर ग्रामीण भागात 262 असे एकूण 357 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *