Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर, प्रतिनिधी

सोलापूर जिल्ह्यात लसीकरणाचा तिसरा टप्प्यात खाजगी व सरकारी रुग्णालय मध्ये 45 वर्षावरील गंभीर आजार असलेल्याही लस टोचली जात आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आज सोमवारी 60 वर्षावरील 2087 ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली  तर गंभीर आजार असलेल्या 582  जणांनी लस घेतली असल्याची माहिती लसीकरणाचे समन्वयक डॉ. अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली.

शहर जिल्ह्यातील खाजगी आणि सरकारी दवाखान्यात कोरोनाची लस  देण्यात येत आहे. आज गुरूवारी ज्येष्ठ नागरिक, गंभीर आजार असलेल्या  नागरिकांना आज लस देण्यात आली.

जिल्ह्यातील 4 लाख 13 हजार 405 तर शहरातील एक लाख सहा हजार 635 गंभीर आजार असलेल्यांना या टप्प्यात लस टोचली जाणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.  दुसऱ्या टप्प्यातील 622 जणांनी लस घेतली असल्याचे डॉ. पिंपळे यांनी सांगितले तसेच आरोग्य कर्मचारी,  महसूल ,पोलीस अंगणवाडी  अशा 32 फ्रन्टलाइन वर्कर्सना लस देण्यात आली.

24 तास लस सुरू

खाजगी, शासकीय रुग्णालयात नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे. चांगला प्रतिसाद मिळत आहे. लस 24 तास द्या अशा सूचना आल्या आहेत उद्यापासून देऊ असेही डॉ. पिंपळे यांनी सांगितले.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हीसीद्वारे 24 तास ला देण्यास सांगितले आहे. त्यानुसार आता खाजगी व शासकीय रुग्णालयात अंमलबजावणी होईल.

या ठिकाणी मिळेल लस

सोलापूर शहरातील सीएनएस हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल, सिद्धेश्वर हॉस्पिटल, सोलापूर कॅन्सर  , मार्कंडेय रुग्णालय, गंगामाई हॉस्पिटल, चिडगुपकर ,रघुजी किडनी केअर हॉस्पिटल ,मोनार्क हॉस्पिटल ,यशोधरा हॉस्पिटल, लोकमंगल जैविक हॉस्पिटल मध्ये 250 रुपयांना ही लस उपलब्ध आहे. महापालिकेच्या दाराशा, साबळे, रेल्वे या शासकीय हॉस्पिटलमध्ये ही लस मोफत दिली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *