सोलापूर,दि.३ : सोलापूर शहर नवीन ५० रूग्णांची भर पडली असून शहर परिसरातील एकूण रुग्ण संख्या ८६११ झाली आहे.
आज शहरातील विविध रुग्णालयातून बरे होऊन गेलेल्या बाधितांची संख्या ७२८७ झाली आहे.
रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ८३८ आहे.तर आजपर्यंत मृतांची संख्या ४८६ झाली आहे. यात ३२६ पुरुष व १६० महिलांचा समावेश आहे.
सोलापूर शहर आज २४४ अहवाल प्राप्त झाले. यात १९४ निगेटिव्ह तर ५० पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यात ३४ पुरुष आणि १६ महिलांचा समावेश आहे. आज ५ जणांची नोंद मृत म्हणून आहे. तर ५६ जण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले.