MH13 NEWS Network
सोलापूर शहरात गुरुवारी दि. 21 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 16 रुग्ण आढळले असून यामध्ये 15 पुरुष तर 1 महिला यांचा समावेश आहे.
आज गुरुवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 903 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 887 निगेटीव्ह तर 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 23 आहे. आज 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
पॉझिटिव्ह व्यक्ती…
रेल्वे लाईन्स, उमा नगरी, वीर फकीरा चौक न्यू बुधवार पेठ, मंत्री चंडक भवानी पेठ, दक्षिण सदरबझार, हुमा मेडिकल सातरस्ता, वसुंधरा सोसायटी मार्केट यार्डमागे, सूदष्णा विहार सातरस्ता, हत्तुरेवस्ती विमानतळजवळ, साखर पेठ, सेलिब्रेशन हॉटेलमागे जुळे सोलापूर, ओम नमः शिवाय नगर, ब्रह्मदेव नगर, सिंधू विहार विजापूर रोड, रंगराज नगर विडी घरकुल या परिसरातील 15 पुरुष आणि 1 महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.
या भागातील दोघांचा मृत्यू
सोलापूर शहर परिसरातील मार्कंडेय नगर कुमठा नाका येथील 65 वर्षांची महिला, शिवगंगा नगर जुळे सोलापूर येथील 71 वर्षांचे पुरुष. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.
शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,592 असून एकूण मृतांची संख्या 627 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 318 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10647 इतकी आहे.
हे आहे महत्वाचे
सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे