Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात शनिवारी दि. 9 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 18 रुग्ण आढळले असून यामध्ये 12 पुरुष तर 6 स्त्रियांचा समावेश आहे.

आज शनिवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 654 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 636 निगेटीव्ह तर 18 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज 41 लोक बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली. तर आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्ती…
अवंती नगर, महेश कॉलनी सम्राट चौक, चचिदंबर नगर जुळे सोलापूर, कुमठे गाव, विडी घरकुल, शेटेनगर दमाणी नगर, सिद्धेश्वर पेठ, आदित्‍य नगर, सावली अपार्टमेंट होटगी रोड, चैतन्य नगर विजापूर रोड, शिवगंगा नगर शेळगी, सुशील नगर विजापूर रोड, सोलापूर कारागृह या परिसरातील बारा पुरुष आणि सहा महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,258 असून एकूण मृतांची संख्या 609 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 277 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10372 इतकी आहे.

हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *