MH13 NEWS Network
सोलापूर शहरात शनिवारी दि. 23 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 19 रुग्ण आढळले असून यामध्ये 9 पुरुष तर 10 स्त्रियांचा समावेश आहे.
आज शनिवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 723 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 704 निगेटीव्ह तर 19 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 27 आहे. तर आज कोरोनामुळे एकाचाही मृत्यू झालेला नसल्याची माहिती देण्यात आली.
पॉझिटिव्ह व्यक्ती…
यल्लालींग मठाजवळ कर्णिक नगर, सवेरा नगर जुळे सोलापूर, बिलाल नगर विजापूर रोड, कामतीकर अपार्टमेंट जुळे सोलापूर, एन.जी.मिल चाळ मुरारजी पेठ, बाळे, वानकर वस्ती देगाव, केकडे नगर मुळेगाव रोड, अशोक चौक, कल्याणी गार्डन विजापूर रोड, चौगुले पार्क मजरेवाडी, न्यू पाच्छा पेठ, गुरुनानक नगर, संजय नगर कुमठा नाका, थोबडे नगर मुरारजी पेठ, किसान नगर, एम.आय.डी.सी. रोड, कल्याणी गार्डन विजापूर रोड या परिसरातील 9 पुरुष आणि 10 महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.
शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,632 असून एकूण मृतांची संख्या 627 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 319 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10686 इतकी आहे.
हे आहे महत्वाचे
सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.