Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात रविवारी दि. 10 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 36 रुग्ण आढळले असून यामध्ये 23 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे.

आज रविवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 704 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 668 निगेटीव्ह तर 36 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर आज 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्ती…
बॉइज् होस्टेल वैद्यकीय महाविद्यालयाजवळ, गीता नगर, आसरा चौक होटगी रोड, महिला हॉस्पिटलमागे होटगी रोड, शुक्रवार पेठ, जयजलाराम नगर, रामलिंग सोसायटी विजापूर रोड, रविवार पेठ, भवानी पेठ, बुधवार पेठ, श्रीकांत नगर जुळे सोलापूर, साखर पेठ, सोरेगाव, शिवगंगा नगर जुळे सोलापूर, मित्र नगर शेळगी, प्रभाकर महाराज मंदिराजवळ सम्राट चौक, वर्धमान नगर भवानी पेठ, बुधवार पेठ, पश्चिम मंगळवार पेठ, सोमवार पेठ, महेश नगर, सेंटथॉमस शाळेजवळ डोणगाव रोड, कोनार्क नगर जुळे सोलापूर, मंगल रेसिडेन्सी जुळे सोलापूर, धर्मराज नगर शेळगी, अरविंदधाम फेस-2 जवळ, कोनार्क नगर या परिसरातील बारा पुरुष आणि सहा महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,294 असून एकूण मृतांची संख्या 610 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 312 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10372 इतकी आहे.

हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *