सोलापूर शहर | 45 पॉझिटिव्ह; तर तीन जणांचा मृत्यू…

MH13 NEWS Network

सोलापूर शहरात मंगळवारी दि. 19 जानेवारी रोजी कोरोनाचे नवे 45 रुग्ण आढळले असून यामध्ये 24 पुरुष तर 21 स्त्रियांचा समावेश आहे.

आज मंगळवारी सोलापूर महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 758 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 713 निगेटीव्ह तर 45 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 85 आहे. आज 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

पॉझिटिव्ह व्यक्ती…
इंदिरानगर शरण मठाजवळ, कोनापुरे चाळ रेल्वे लाईन्स, वानकर वस्ती देगाव, पश्चिम मंगळवार पेठ, सम्राट चौक, मुकुंदनगर, स्वागत नगर कुमठा नाका, हनुमान नगर भवानी पेठ, प्रगती सोसायटी नवजीवन नगरजवळ, ७० फूट रोड, तेलंगी पछा पेठ, नवी पेठ, मुस्लिम पाच्छा पेठ, चाणक्य नगर सैफुल, पोलिस मुख्यालयाजवळ, देगाव, लक्ष्मी चाळ जुनी मिलजवळ, गांधी नगर मसिहा चौक, आर.टी.ओ. कार्यालयाजवळ शिवाजी सोसायटी, स्वामी विवेकानंद नगर सैफुल, मजरेवाडी गाव, युनायटेड ग्रीन चौगुले पार्क होटगी रोड, ओम नमःशिवाय नगर हत्तुरेवस्ती, दाजी पेठ, एम.आय.डी.सी. अक्कलकोट रोड, पद्मशाली सोसायटी, विद्यानागर, भोईटे गल्ली देगाव, धोंडीबा वस्ती रामवाडी, रेल्वे लाइन्स या परिसरातील 24 पुरुष आणि 21 महिला पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल मिळाला आहे.

या भागातील तिघांचा मृत्यू

सोलापूर शहर परिसरातील शेटे नगर दमाणी नगर येथील 69 वर्षांचे पुरुष, दक्षिण सदरबझार येथील 81 वर्षांचे पुरुष, महेश सोसायटी सम्राट चौक येथील 82 वर्षांचे पुरुष यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

शहरातील आजपर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11,540 असून एकूण मृतांची संख्या 624 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 314 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 10602 इतकी आहे.


हे आहे महत्वाचे

सोलापूर महानगरपालिकेकडून कोरोना बाधितांची व शहरातील covid-19 हॉस्पिटलच्या माहितीसाठी संपर्क करण्याकरिता कोविड कंट्रोल रूम सोलापूर महानगरपालिका या विभागाकडील मोबाईल क्रमांक 9823291818,व फोन क्रमांक 0 217-2740341 या नंबर वर तसेच ccmsc२०२०@gmail.com या इमेल द्वारे संपर्क करावे.