Latest Post

बलात्कार प्रकरणी युवकास जामीन मंजूर SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात मुदतवाढ

MH13 News Network

सोलापूर ग्रामीणमध्ये आज आणखीन 149 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे.पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतेय.
आज शुक्रवारी दि.19 मार्च रोजी ग्रामीण भागातील 149 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 91 पुरुष तर 58 महिलांचा समावेश होतो. आज बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 53 आहे. यामध्ये पुरुष 32 तर 21 महिलांचा समावेश होतो .आज 1 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

आज एकूण 3694 कोरोना अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी 3545 अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील आजपर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या बाधित रुग्णांची संख्या 42 हजार 289 इतकी झाली आहे. यामध्ये 26,297 पुरुष तर 15,992 महिला आहेत. यामध्ये एक व्यक्ती पुणे येथे पॉझिटिव्ह आढळून आली आहे.

एकाचा मृत्यू
पंढरपूर येथील लक्ष्मी टाकळी येथील 72 वर्षाची स्त्री 16 फेब्रुवारी रोजी रात्री सीएनएस हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल झाली होती. उपचारादरम्यान 16 मार्च रोजी दुपारी त्यांचे निधन झाले त्यांचा covid-19 अहवाल प्राप्त असून तो पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात 1205 जणांचा मृत्यू झाला आहे यात 866 पुरुष तर 339 महिलांचा समावेश होतो जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांची संख्या 1192 आहे .यामध्ये 718 पुरुष तर 474 महिलांचा समावेश होतो. आज पर्यंत रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींची संख्या 39 हजार 892 यामध्ये 24,713 पुरुष तर 15,179 महिलांचा समावेश होतो.

अक्कलकोट -नागरी 1 तर ग्रामीण 1

बार्शी –नागरी 25 तर ग्रामीण 18

करमाळा –नागरी 6 ग्रामीण 54

माढा – नागरी 0 तर ग्रामीण 9

माळशिरस – नागरी 0 तर ग्रामीण 7

मंगळवेढा – नागरी 1 ग्रामीण 2

मोहोळ – नागरी 0 ग्रामीण 7

उत्तर सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 1

पंढरपूर – नागरी 9 ग्रामीण 5

सांगोला – नागरी 1 ग्रामीण 2

दक्षिण सोलापूर – नागरी 0 ग्रामीण 0

आजच्या नोंदी नुसार नागरी 43 तर ग्रामीण भागात 106 असे एकूण 149 कोरोना बाधित व्यक्ती आढळून आल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *