स्पर्धा परीक्षेसाठी परिश्रमपूर्वक प्रयत्न केले तर यश आपल्या पायाशी आहे यातून देशसेवा करण्याची संधी घ्यावी असे प्रतिपादन सलमानताज पटेल आयपीएस लखनऊ यांनी केलेल. सोशल महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. सोशल महाविद्यालयात व जमियत उलमा ई हिंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमास जमियत उलमा ई हिंद अध्यक्ष मौलाना इब्राहिम उपाध्यक्ष अय्युब मंगलगिरी, कोषाध्यक्ष श्री मैनोद्दीन शेख व सदस्य उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.आई.जे तांबोळी होते आपल्या भाषणात पुढे म्हणाले की सुनियोजितपणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास पूर्ण करून जिद्द व मेहनतीने विषयाची मांडणी करण्यास शिकले पाहिजे. कुराण पठनाणे कार्यक्रमाचा प्रारंभ झाला, स्वागत व प्रास्ताविक डॉ.ए.ए.गढवाल यांनी केले जमियत उलमा ई हिंद अध्यक्ष यांनी भूमिका मांडली प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ.जैनोद्दीन मुल्ला यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.जैनोद्दीन पटेल यांनी केले.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी स्वतंत्र ग्रंथालय व वाचनालय याची उपलब्धता तसेच विविध शासकीय जागांच्या माहितीचे फलक लावण्यात येईल असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.आई.जे.तांबोळी यांनी केले व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य डॉक्टर डॉ.आई.जे.तांबोळी,डॉ. ए.ए.गढवाल,जमियत उलमा ई हिंद अध्यक्ष मौलाना इब्राहिम, उपाध्यक्ष अय्युब मंगलगिरी,कोषाध्यक्ष श्री मैनोद्दीन शेख