म.पो केंद्र, पाकणी चे वतीने अप्पर पो.महासंचालक सो( वाहतुक), मुंबई यांचे संकल्पनेतील व पो.अधिक्षक सो , पो. उप अधिक्षक सो महामार्ग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली ‘हायवे मृत्युंजय दुत ‘या योजनेचे उद्घाटन वैभव गुंड, अध्यक्ष समर्थ भवानी महाराज संस्था यांचे शुभहस्ते करण्यात आले.
सदर वेळी आम्ही स्वत: सदर संकल्पनेचे महत्त्व समजावुन सांगुन ज्यांना ‘मृत्युंजय दुत’ म्हनुन नेमणाऱ्यात येणार आहे त्यांना जखमीना कशा प्रकारे मदत करावी, रक्तस्त्राव कसा थांबवावा, व नजिकच्या हॉस्पीटल मध्ये लवकरात लवकर कसे नेण्यात यावे याबाबत डॉक्टर राजमाने यांनी प्रात्यक्षिक सह मार्गदर्शन केले आहे यापुढे ‘हायवे मृत्युंजय दुत’ म्हणुन ज्यांना नेमण्यात येणार आहे त्यांची चारित्र्य पडताळणी करून त्यांना आयकार्ड व ग्रुप वाईज स्ट्रेचर , प्रथमोपचार पेटी इत्यादी साहित्य देण्याची तजवीज ठेवलेली आहे तसेच कोरोना चा वाढता प्रभावामुळे मोजक्या व्यक्तींना आमंत्रित करून योग्य ती काळजी घेवुन कार्यक्रम संपन्न केला आहे तरी या पुढेही ही संकल्पना प्रभावीपणे राबवित आहोत.
सदर कार्यकमास पोसई खरात, प्राचार्य गायकवाड व शिक्षक ग्रामस्थ , पो. अंमलदार पाकणी असे उपस्थित होते .