Latest Post

Пин Ап Казино — Официальный сайт Pin Up Casino Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş

‘किसान आंदोलन या देशविरोधी षड्यंत्र ?’ या विषयावर विशेष परिसंवाद

हे ‘किसान आंदोलन’ नसून देशविरोधातील एक ‘युध्द’ ! 

रस्त्यावर येऊन शेतकर्‍यांंसाठी आंदोलन केले गेले आणि सरकार, पोलिसही काही करू शकले नाही. न्यायालयानेही फक्त पर्यवेक्षक पाठवून सर्व काही पोलिसांवर सोडले आणि पोलिसही प्रतिकार करू शकले नाहीत. या आंदोलनात तलवारी आणि इतर हत्यारांचा उपयोग केला गेला, देशविरोधी नारे दिले गेले. हे आंदोलन नसून देशविरोधातील एक युध्द छेडले आहे. याला युध्द न म्हणता ‘लोकतांत्रिक आंदोलन’ म्हटले जात आहे ! या आंदोलनात असे काय नाही झाले, ज्याला आपण अनैतिक आणि कायद्याच्या विरोधात आहे, असे म्हणू? मात्र यात सहभागी असलेल्यांनी याला कायद्याच्या चौकटीत बसविले आहे. या आंदोलनाने देशातील लोकतंत्राचा दुरूपयोग केला आहे, असे स्पष्ट प्रतिपादन सुदर्शन वाहिनीचे मुख्य संपादक आणि अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिंन्दू राष्ट्र की’ या कार्यक्रमांतर्गंत ‘किसान आंदोलन या देशविरोधी षड्यंत्र?’ या विशेष परिसंवादात बोलत होते. *हा कार्यक्रम ‘यु ट्यूब लाइव्ह’ आणि ‘फेसबुक’ यांच्या माध्यमांतून 34 हजारांहून अधिक लोकांनी पाहिला.*

प्रसिध्द लेखिका आणि ‘मानुषी’ मासिकाच्या संपादिका *प्रा. मधु पूर्णिमा किश्‍वर यावेळी म्हणाल्या* , ‘देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आतापर्यंत विविध सरकारांनी तसेच येथील समाजाने वामपंथी, इस्लामी गट आणि यांना पैसे पुरवणार्‍या विदेशी संस्थांना हवे तसे कायदे करण्याची खुली सूट दिली. त्यांच्या अनुमतीशिवाय कुठलाही नवीन कायदा होणार नाही, याची त्यांना आता सवय झाली आहे. कायदा मंत्रालयाचीही यांच्या विरोधात जायची हिंमत नाही, असे खेदाने म्हणावे लागत आहे. याउलट भारत हा हिंदूबहुल देश असूनही सरकार सुध्दा हिंदूंच्या विरोधात वागते, हे अनेक उदाहरणांतून स्पष्ट झाले आहे. सध्या जन्माने हिंदू असलेले नेतेच देशात हिंदूंच्या विरोधात विष आणि समाजात विषमता पसरवत आहे. असे सुरूच राहिले तर किती दिवस आपला हिंदू समाज तग धरणार ?’

*हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यावेळी म्हणाले,* ‘शेतकरी आंदोलनाच्या वेळी जे घडले, त्याविषयीची वास्तविकता पाहता ही संकटांची चाहूल नसून हे संकट देशाच्या राजधानीत ते सुध्दा प्रजासत्ताक दिनी सर्व सीमा पार करून आपल्या दाराशी आले आहे. या शेतकर्‍यांंच्या आंदोलनात खालिस्तानवाद्यांच्या पुस्तकांचे, दारूचे वाटप केले गेले. हे सर्व कोण पुरवत आहे ? आपल्याकडे सर्व यंत्रणा असताना नंतर का लक्षात येते ? शेतकर्‍यांंच्या आंदोलनाविषयी शेतकरीच बोलतील, असा प्रचार सध्या काही राजकीय विशेषत: वामपंथी नेते आणि तथाकथित विचारवंतांकडून केला जात आहे. हे शेतकरी आहेत का ? मग हिंदुत्वाला न मानणारे हे नेते, विचारवंत हिंदूंविषयी का बोलतात ? देशात सुरू असलेल्या खोट्या प्रचारतंत्रांविषयी हिंदू समाजाला जागृत करण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्राची विचारधारा सर्व प्रश्‍नांवर उत्तर आहे, हे लक्षात घेतले पाहिजे’.

आगरा येथील ‘इंडिक एकेडमी’चे समन्वयक. विकास सारस्वत यावेळी म्हणाले, ‘सध्या सुरू असलेले किसान आंदोलन हे आंदोलनाच्या नावाखाली ‘आंदोलन’ होत आहे. ‘सीएए-एन्आर्सी’ याप्रमाणे कुठलाही विशिष्ट बिंदू न पकडता दगडफेक, पोलिसांना मारहाण तसेच देशाच्या संपत्तीचे नुकसान करून हे आंदोलन केले गेले. 26 जानेवारीला यांनी केलेले आंदोलन हा ‘विद्रोह’ नाही, तर ‘राजद्रोह’ होता. जे समूह या आंदोलनात जोडले आहेत, त्यांचा वेगळ्या कारणांसाठी वापर केला जात आहे, हे दुर्भाग्य आहे.’

आपला नम्र,

रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदु जनजागृती समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *