अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून शहरातील 19 पानटपऱ्यावर धाडी

टपऱ्या केल्या सील, 19 जणांवर गुन्हा दाखल

सोलापूर, प्रतिनिधी

राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू व प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या  उत्पादन, साठा, विक्री,वितरण व वाहतूक करण्यास बंदी आहे.

सोलापूर जिल्ह्यात अवैध व छुप्या मार्गाने प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री होत असल्यामुळे अन्न व औषध प्रशासन व पोलिस प्रशासनामार्फत  अन्न पदार्थांची वाहतूक व साठवणूक गोडाऊन या ठिकाणी धाडी टाकून प्रतिबंधित अन्न पदार्थ विक्री वर कारवाई करण्यात आली. शहरातील टपऱ्या सील करून 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यास कर्नाटक सीमा लागून असल्यामुळे काही लोक शेजारील कर्नाटक राज्यातून सर्रास प्रतिबंधित अन्न पदार्थ सोलापूर जिल्ह्यात विक्री करीत असल्याचे आढळून आले आहे. पोलिस  आयुक्त, अंकुश शिंदे व पोलिस उपायुक्त वैशाली कडुकर व अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त  प्रदीप राऊत यांनी एकत्रित मोहीम आखून सोलापूर शहरातील  सात पोलिस ठाण्यांच्या अंतर्गत १९ पानटप-यावर अचानक धाडी टाकून सदर मोहीम राबवली.

या कारवाईत १९ पान टप-या सील करण्यात आलेल्या आहेत व सदर प्रकरणी १९ व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या कारवाई मध्ये सदर बझार पोलिस ठाणे येथे अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांनी  लोकसेवा पान शॉप, सदर बझार, सोलापूर, जावेद मैनुद्दीन शेख पान शॉप, रेल्वे लाईन, सोलापूर व मुद्दसर करीम शेख पान शॉप, रेल्वे लाईन, सोलापूर  या ०३ पेढी सील करून ७०७९ रूपयांचा मुद्देमाल जप्त केरून सदर बझार पोलिस ठाणे येथे तीन व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल केले. फौजदार चावडी पोलिस ठाणे येथे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती न.त. मुजावर यांनी ओमप्रकाश पान शॉप,  भैय्या चौक, सोलापूर, भारत पान शॉप, भैय्या चौक, सोलापूर, जनता पान शॉप, भैय्या चौक, सोलापूर व लक्ष्मी पान शॉप, भैय्या चौक, सोलापूर या ०४ पेढी सील करून ४१२० रूपयांचा मुद्देमाल करून फौजदार चावडी पोलिस ठाणे येथे चार व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल केले.  जोडभावी पेठ पोलिस स्टेशन येथे अन्न सुरक्षा अधिकारी योगेश देशमुख यांनी   दुर्गा पान शॉप, भवानी पेठ, सोलापूर, सिध्देश्वर पान शॉप, भवानी पेठ, सोलापूर

व स्वामी कोल्ड्रींक्स व पान शॉप, भवानी पेठ, सोलापूर या ०३ पेढी सील करून १०२४५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला व जोडभावी पेठ पोलिस ठाणे येथे तीन व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल केले.

जेलरोड  पोलिस ठाणे येथे अन्न सुरक्षा अधिकारी श्री भारत भोसले यांनी बाशा पान शॉप,विजापूर वेस, सोलापूर ही पेढी सील करून ५५५७ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला व सदर पेढी सील करून जेल रोड पोलिस ठाणे येथे एका व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल केला.

एमआय डी सी पोलिस ठाणे येथे अन्न सुरक्षा अधिकारी  उमेश भुसे यांनी  धनेश्वरी पान शॉप, निलम नगर, एम.आय.डी.सी रोड व  बनशंकरी पान शॉप, सोलापूर या ०२ पेढी सील करून १३१९७ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला व एम आय डी सी पोलिस ठाणे येथे दोन व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल केले.

विजापूर नाका पोलिस ठाणे येथे अन्न सुरक्षा अधिकारी  प्रज्ञा सुरसे  यांनी बाबा पान शॉप, आसरा चौक, होटगी रोड, सोलापूर व उमा पान शॉप, म्हाडा कॉलनी, जुळे सोलापूर, सोलापूर या  ०२ पेढी सील करून ९१५९ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला व विजापूर नाका पोलिस ठाणे येथे दोन  व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल केले.

सलगर वस्ती  पोलिस ठाणे येथे अन्न सुरक्षा अधिकारी  प्रशांत कुचेकर यांनी  उमर भाई पान शॉप, साई बाबा चौक, सोलापूर, शिवानंद किराणा व जनरल स्टोअर्स, जुनी लक्ष्मी चाळ, डोणगाव रोड, सोलापूर ,

इब्राहीम मेहबूब शेख यांचे अस्थायी दुकान, सीएनसी हॉस्पिटल जवळ, देगाव, सोलापूर

व सातलिंगप्पा शिवलिंगप्पा निंबाळ यांचे अस्थायी दुकान, सीएनसी हॉस्पिटल जवळ, देगाव, सोलापूर  या  पेढी सील करून ४६०४ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला व सलगर वस्ती पोलिस ठाणे येथे चार व्यक्तींविरूद्ध गुन्हे दाखल केले.

कारवाईत सर्व गन्हे  भादंवि ३२८, १८८,२७२,२७३,३४ व अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत कलम ५९ नुसार  दाखल करण्यात आले आहे.

सदर कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी भारत भोसले, मंगेश लवटे, उमेश भुसे,प्रशांत कुचेकर, योगेश देशमुख व  नसरीन मुजावर व प्रज्ञा सुरसे यांनी पार पाडली.