Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

युवकांच्या उज्जवल भविष्यासाठी धावून आला ‘अजय’

पोलीस भरतीची तयारी करणार्‍यांना देतोय धडे
‘नफा ना तोटा’ या तत्वावर चालते अकॅडमी

सोलापूर : हल्लीच्या तरुणाईला खाकी वर्दीचं प्रचंड आकर्षण आहे. पोलीस भरती होऊन गृहखात्यात सेवा बजावावी, यासाठी तरुण स्वप्न पाहत असतात. लाखो तरुण प्रचंड मेहनत घेतात. पोलीस भरतीमधील वाढती स्पर्धा लक्षात घेता अनेक शारीरिक चाचणी आणि लेखी परीक्षेच्या तयारीसाठी खाजगी क्लासचा आधार घेतात. मात्र असेही काही तरुण आहेत, ज्यांना आजही खासगी क्लास पैश्याअभावी लावता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन सोलापूरातील एक अश्या गरजू तरूणांना माफक दरात ‘नफा ना तोटा’ या तत्वावर धडे देत आहे.

विद्यार्थी

अजय सुरेश जाधव असं या 25 वर्षीय युवकांच नाव आहे. सोलापूर शहरानजीक असलेल्या मुळेगाव तांडा हे ४ हजार लोकसंख्येचे गाव आहे. येथेच हा युवक ‘यूथ अॅथलेटिक्स कोचिंग सेंटर’ हा खाजगी क्लास चालतो. या क्लासच्या माध्यमातून तो अत्यंत माफक दारात मुलांना घडवण्याचे काम करत आहे. क्लासमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दोनशे रुपये शुल्क आकारले जाते. या दोनशे रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्य पुरवले जाते.

अजय हा अत्यंत मध्यमवर्गीय कुटुंबातला असून त्याला परिस्थितीची जाणीव आहे. पोलीस भरतीमधील शारीरिक चाचणीचे धडे घेताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात आणि पोलीस भरतीमध्ये आपल्या गावातील युवकांची संख्या वाढावी या हेतूने त्याने ही २०१८ मध्ये अकॅडमी सुरू केली आहे. दररोज सकाळी ६ ते ८ यावेळेत मुले फिटनेसचे धडे गिरवतात. येथील विद्यार्थ्यांना विविध व्यायामाचे प्रकार आणि डायट प्लॅनबद्दल दररोज मार्गदर्शन केले जाते.

अजय हा स्वत: खेळाडू आहे. तो उत्तम धावपटू आहे. तसेच लाँग जम्प आणि ट्रिपल जम्प या क्रीडा प्रकारात विद्यापीठ स्तरीय सामन्यात त्याने सुवर्ण यश मिळवले आहे. एक खेळाडू असल्यामुळे त्याला यातील बरेच बारकावे माहिती अाहेत. म्हणून तो मुलांना फिटनेसचे योग्य धडे देत आहे. शिवाय तो स्वत: पोलीस भरतीची तयारी करतोय. आपल्या भरतीच्या तयारीसोबत तो इतर मुलांनाही तयार करण्याचे काम करत आहे.

सध्या २६ युवक अजयच्या मार्गदर्शनाखाली फिटनेसचे धडे गिरवत आहेत. अजय सध्या सोलापूर शहर पोलीस दलात होमगार्ड म्हणून कार्यरत आहे. लहानपणापासून अापण पोलीस व्हावे, अशी त्याची इच्छा अाहे. यासाठी तो सतत मेहनत घेतोय. होमगार्ड होण्याआधी तो चहाची कॅन्टीन चालवत होता. काम करत त्याने संगमेश्वर महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. २०१९  होमगार्ड झाल्यानंतर त्याने ती चहाची कॅन्टीन बंद केली.

 

अजय जाधव

उत्तम खेळाडू तयार व्हावे म्हणून. . .

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना शारीरिक चाचणीचे योग्य धडे देण्यासाठी आणि जास्त जास्त युवकांना पोलीस भरतीत यश मिळावे, यासाठी ही अॅकडमी दोन वर्षांपूर्वी सुरू केली आहे. माझ्या मार्गदर्शनाखाली उत्तम असे खेळाडू घडावे, ही मनोमन इच्छा आहे.

अजय सुरेश जाधव
युवक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *