Latest Post

10+ Best Crypto As Well As Bitcoin Craps Casinos June 2024 Top 10 Mobile Casinos Real Money Game Titles In 202

Big9 News

      जुना प्रभाग १६ शामा नगर अब्दुलपुरकर मंगलकार्यालय मोदी येथे हात से हात जोडो अभियान कार्यक्रम

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत, जूना प्रभाग क्रमांक १६ शामा नगर, अब्दुलपुरकर मंगलकार्यालय समोर मोदी येथे मा. नगरसेवक नरसिंग कोळी यांनी “हात से हात जोडो” अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी बोलताना आमदार प्रणिती शिंदे म्हणाले, देशात, राज्यात भाजपा सरकार आल्यापासुन गोरगरीब, दिनदलित, अल्पसंख्यांक, मागासवर्गीय, महिलांवर अन्याय अत्याचार वाढले आहेत, महागाई, बेरोजगारी, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरचे दर गगनाला भिडले, काँग्रेसच्या काळात तीनशे रुपये असलेला गॅस सिलेंडरचा दर मोदी सरकारने बाराशे रुपये केले. नोटबंदी आणि GST ने उद्योगधंद्याची वाट लावली. शेतकऱ्यांना हमीभाव नाही, पेंशन बंद केले जात आहे. रेशनवर धान्य मिळत नाही. अन्यधान्यावर कर लावण्यात आले. योग्यप्रकारे उपाययोजना न करता कोरोना काळात दिवे आणि ताटे वाजवायला सांगितले. उद्योगपती मित्रांचे हजारो कोटीचे कर्जे माफ केले जात आहेत. खासदार राहुलजी गांधी, काँग्रेस नेते आणि विरोधक या विरोधात आवाज उचलले तर त्यांच्याविरोधात इडी, सीबीआय सारख्या संविधानिक संस्थाचा वापर करून तुरुंगात डांबले जात आहे, संसदेत विरोधकांचे माईक बंद केले जात आहे म्हणून मोदी सरकारच्या या हुक़ूमशाहीच्या विरोधात खासदार राहुलजी गांधी यांनी “भारत जोडोच्या” अभियानातुन सर्वसमान्यांचा आवाज बुलंद केला त्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वतीने “हात से हात जोडो” अभियानाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी, महिलांसाठी, युवकांसाठी, शेतकरी बांधवांसाठी, कामगारांसाठी रस्त्यावर उतरून प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन भाजपा मोदी सरकार, राज्यातील खोके सरकार यांच्या कारभाराचा फर्दाफ़ाश करणार आहोत. तसेच काँग्रेस पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचवणार आहोत. चेतनभाऊ नरोटे अध्यक्ष झाल्यापासुन सर्वाना बरोबर घेऊन जोमात कार्य करत आहेत आज नगरसेवक नरसिंग कोळी यांनी “हात से हात जोडो” अभियानाचा कार्यक्रम घेऊन गोरगरीब जनतेच्या प्रश्नाला वाचा फोड़ली आहे.

या हात से हात जोडो अभियान कार्यक्रमास कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, प्रदेश चिटणीस किसन मेकाले, नरसिंह आसादे, युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे, ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, मध्य अध्यक्ष वाहिद बिजापुरे, उत्तर अध्यक्ष महेश लोंढे, अँड केशव इंगळे, बसवराज म्हेत्रे, भीमाशंकर टेकाळे, अंबादास बाबा करगुळे, राजन कामत, अंबादास गुत्तिकोंडा, वाहिद नदाफ, नागनाथ कासलोलकर, हाजिमलंग नदाफ, तिरुपती परकीपंडला, भारतयात्री इरफान शेख, वसिष्ठ सोनकांबळे, VD गायकवाड, उपेंद्र ठाकर, सुभाष वाघमारे, नागनाथ शावने, राजेश काडादी, महादेव येरणाळ, भिमु कोळी, श्रीनिवास व्हसकेरी, मनोज चलवादी, शंकर कोळी, उमेश कोळी, चंदू नाईक, याकूब कडेपागुल, मनोहर चकोलेकर, लक्ष्मीबाई कोळी, नागेश म्हात्रे, सचिन राठोड, सतीष महाराज यांच्यासह त्या भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्तीत होते.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक नगरसेवक नरसिंग कोळी यांनी, सूत्रसंचालन तिरुपती परकीपंडला, तर आभार ब्लॉक अध्यक्ष बाबुराव म्हेत्रे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *