बार्शी,दि.7 : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते (Superintendent of Police Tejaswi Satpute) यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंदे व अवैध व्यवसायाविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. येथील लातूर रोडवरील एका खासगी लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सात महिलांना ताब्यात घेण्यात आले असून मालकासह पाचजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्यामराव गव्हाणे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीनंतर लॉजचा व्यवस्थापक संजय टाळके ( रा. उस्मानाबाद ), चंद्रकांत पवार ( राऊत चाळ, बार्शी ) तसेच सागर लोखंडे ( रा. वाणेवाडी, ता. बार्शी ), अजय गिराम ( गोरमाळे, ता. बार्शी ) व सैफन शेख ( रा. अमन चौक, बार्शी ) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबरोबरच तालुका पोलिसांनीही जामगाव आ. हद्दीतील लॉजवर छापा मारून कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. याप्रकरणी पोलिसांनी लॉजमालक राजेंद्र भीमराव मराठे (रा. बार्शी) व दलाल श्रीहरी सुखदेव मुठाळ (वय 25, रा. खामगाव) या दोघांविरुद्ध पोलीस नाईक अप्पासाहेब लोहार यांनी तक्रार देताच गुन्हा दाखल केला. ही घटना 4 मार्च रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. बार्शी तालुका पोलिसांनी ही कारवाई केली.
पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात संशयित आरोपी एका पीडित महिलेस लॉजमध्ये आश्रय देऊन लैंगिक स्वैराचारासाठी वापर करून कुंटणखाना चालवीत असताना मिळून आले, अशा आशयाची फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे करत आहेत.
Leave a Reply