Latest Post

Onwin Casino Giriş – Onwin Güncel Giriş कृषी महाविद्यालयाच्या कृषीदूतांमार्फत डिगोळ येथे जनावरांचे लसीकरण

महेश हणमे/९८९०४४०४८०

विविध प्रकारच्या जाहिरातीमुळे अनेकदा फसवणूक झाल्याच्या घटना घडतात .व्यवस्थित माहिती न घेतल्यामुळे सोलापूर शहरातील बाळे भागात राहत असणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेस आर्थिक फटका बसला आहे.

याबाबत सविस्तर हकीकत अशी की,एका वृत्तपत्रात नोकरीविषयक या छोट्या जाहिराती मध्ये ‘एअरपोर्ट’ पक्का जॉब सरळ जॉइनिंग या मथळ्याखाली जाहिरात देण्यात आलेली होती. त्यामध्ये विविध पदांकरिता जाहिरात असल्याचे बाळे भागात राहणाऱ्या मालाश्री संदीप बारखडे ( वय वर्ष 25, राहणार A/ 29 श्रद्धा एलिगन्स,बार्शी रोड ,लोकमंगल विहार, बाळे सोलापूर) यांना दिसून आले .

जाहिरातीत दिलेल्या मोबाइल क्रमांकावर मालाश्री यांनी त्यांच्या पतीच्या मोबाईलवरून संपर्क साधला असता एका स्त्रीने मोबाईलवर आपले नाव नंदिनी रॉय असे सांगितले. बारखडे यांना तुमचे शिक्षण किती आहे, याची विचारणा करुन एयर टिकिट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी तुमची नियुक्ती होईल, तुम्ही रजिस्ट्रेशन करा असे सांगून रजिस्ट्रेशन फी साठी दीड हजार रुपये पाठविण्यास सांगितले.
कोटक महिंद्रा बँकेचे खाते असलेला खाते क्रमांक त्यांना मेसेज करून पाठवला .याच सोबत तुम्हाला सोलापूर विमानतळ येथेच नोकरीच नियुक्त केले जाईल असेही फोनवरून सांगितले.
सोलापुरातच नोकरी मिळेल म्हणून मालाश्री बारखडे यांच्या पतीने ‘गुगल पे’ द्वारे 15 ऑक्टोंबर रोजी संशयित आरोपींच्या फोन क्रमांकावर पैसे पाठवले .त्यावर तुमच्या पत्नीच्या कागदपत्रांची पडताळणी झाली आहे, तुमचा पत्ता पाठवा असे समोरून सांगण्यात आले
24 ऑक्टोंबर रोजी फिर्यादीच्या पतीने ऑफर लेटरचा पत्ता चुकला आहे, लेटर औरंगाबादला गेले असे फोनवर जाहिरातदार संशयित आरोपींना सांगितले. तेव्हा त्यांनी इमेलवर ऑफर लेटर पाठवले.

ऑफर लेटर मिळाल्यावर आजच्या आज ट्रेनिंग व सिक्युरिटी चार्जेस त्यासाठी 25 हजार 500 रुपये पाठवा. आजची शेवटची तारीख आहे. तुम्हाला ऑफर लेटर उशिरा मिळाल्याने आजच्या आज पैसे पाठवा असे सांगितले. यावर मालाश्री यांच्या वतीने वतीने संशयित आरोपींच्या खात्यावर पंचवीस हजार 500 रुपये पाठवले .दिनांक 26 ऑक्टोंबर रोजी फिर्यादीच्या पतीच्या मोबाईलवर मेसेज करून तुमचे पैसे मिळाले आहेत. तुमचे एका महिन्याचे ट्रेनिंग असून 28 ऑक्टोबर पासून प्रशिक्षण सुरू होईल. यासाठी 22 हजार पाचशे रुपये भरावे लागतील असा मेसेज केला.
त्यावेळी बारखडे यांना संशय निर्माण झाला .त्यामुळे त्यांनी पैसे पाठवले नाहीत. यानंतर सोलापूर विमानतळ येथे जाऊन या जाहिराती बाबत चौकशी केली असता कोणत्याही प्रकारची जाहिरात दिली नसून कुठल्याही प्रकारची भरती नसल्याचेही त्यांना कळाले. त्यामुळे आपली फसवणूक झाली हे लक्षात आल्याने मालाश्री बारखडे यांनी संशयित आरोपींच्या विरोधात 27 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद नोंदवली आहे. सदर प्रकरणी फौजदार चावडीमध्ये आरोपींच्या विरोधात 420 सह IT Act 66(ड)चा गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सचिन हार करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *