Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..
  • जिल्ह्यातील साडेचार लाख बालकांना लस देणार
    मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांची माहिती

सोलापूर, दि.३०: जिल्ह्यात उद्या दि.३१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरणाचा डोस दिला जाणार आहे. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील ४ लाख ५२ हजार ७३९ बालकांना पोलिओ लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाने पोलिओ लसीकरणाची जय्यत तयारी केली असून ७५३५ अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती एवढे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहे. शहरी आणि ग्रामीण भागात ३२२७ पोलिओ लसीकरण केंद्रे असून प्रत्येक केंद्रावर लस उपलब्ध असणार आहे. याशिवाय २१२ ट्रांझीट टीम आणि १३१ मोबाईल टीम कार्यरत राहणार आहेत. ३१ जानेवारी रोजी पोलिओपासून वंचित राहिलेल्या बालकांना २ ते ४ फेब्रुवारी २०२१ असे तीन दिवस आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती घरोघरी, वाडीवस्ती, ऊसतोड टोळी, वीट भट्टी याठिकाणी भेटी देऊन लस देणार आहेत, असेही श्री. स्वामी यांनी सांगितले.

 

सर्व पालकांनी आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ केंद्रावर नेऊन लस पाजवून घ्यावी, असे आवाहन श्री. स्वामी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *