सोलापूर, प्रतिनिधी
२०२०-२१ या शैक्षणिक वर्षात हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य विभागातून उल्लेखनिय कामगिरी करित पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत यशाची भरारी घेतली आहे.
एम.कॉम. विभागातून कु. सलमा पटेल हिने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावित दोन सुवर्ण पदके मिळविली. तसेच कु. प्रियांका बिराजदार व कु. मेघना लखोटिया यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. एम.बी.ए. विभागातून कु. राधिका बिहानी हिने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक पटकावित दोन सुवर्ण पदके मिळविली तसेच कु. हर्षा नामदेव व म. उमर म. इकबाल मोतीवाला यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला. त्याच बरोबर बी. कॉम. विभागातून कु. ऐश्वर्या सामल हिने विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत चतुर्थ क्रमांक पटकावला. बी.सी.ए. विभागातून कु. अमृता कोतलापुरे हिने विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकविला. बी. बी.ए. विभागातून कु. तुलसी चौधरी हिने प्रथम तर जयेश ग्यामलानी व कु. जान्हवी जोशी यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला आहे.
वालचंद शिक्षण समुहाचे समस्त विश्वस्त, प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Leave a Reply