Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सोलापूर शहरात आज शुक्रवारी दि.9 ऑक्टोबर रोजी कोरोनाचे नवे 79 रुग्ण आढळले असून यामध्ये 45 पुरुष तर 34 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 61 इतकी आहे.
आज शुक्रवारी मनपाने कोविडविषयक दिलेल्या माहितीनुसार 631 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये जणांचे 552 निगेटीव्ह आहेत.

आज 1 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असल्याची नोंद करण्यात आली आहे.अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य अधिकारी यांनी दिली.

शहरातील आतापर्यंतच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 8941 असून एकूण मृतांची संख्या 497 इतकी आहे. आजपर्यंत रुग्णालयात दाखल असलेल्या बाधितांची संख्या 837 इतकी तर बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 7607 इतकी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *