सोलापुरातील युवकांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला असून त्यामुळे अनेक गरीब व गरजू विद्यार्थिनींना मदतीचा हात मिळाला आहे.
दि. 23 जानेवारी 2021 रोजी सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर, ग्रामीण विद्यार्थ्यांनी सायकल बँक सोलापूर आणि स्मार्ट रोड सेफ्टी फाउंडेशन, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पाथरी येथील ऐतिहासिक इंचगिरी संप्रदाय श्री सिद्धरामेश्वर महाराज मठ व पाथरी या गावाला सायकल स्वारांनी भेट दिली. यावेळी ग्रामीण विद्यार्थ्यांनी सायकल बँकतर्फे गावातील गरीब व गरजू विद्यार्थिनींना दोन सायकली भेट देण्यात आल्या
साधारणपणे 30 ते 40 सायकल स्वारांनी सात रस्ता – भैया चौक – मरीआई चौक – देगाव – बसवेश्वर नगर ते पाथरी आणि परत माघारी सोलापूर असा साधारण 40 किमी चा सायकल प्रवास केला.
यावेळी पाथरी गावच्या ग्रामस्थांनी सर्व सायकल स्वारांचे स्वागत केले तसेच यावेळी गावाच्या वेशीवर पोलिस अधिक्षक मा. तेजस्वी सातपुते व मनपा उपायुक्त धनराज पांडे साहेब यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
सदर वेळी ग्रामीण विद्यार्थ्यांनी सायकल बँक तर्फे गावातील गरीब व गरजू विद्यार्थिनींना दोन सायकली भेट देण्यात आल्या असून सदर मुलींची दहावी झाल्यानंतर त्यांनी पुढील गरजू विद्यार्थीनीना सायकल द्याव्यात असे मत ग्रामीण विद्यार्थीनी सायकल बँकचे व्यवस्थापक श्री. विश्वनाथ गायकवाड यांनी मांडले. तसेच प्राध्यापिका सौ. मोलश्री गायकवाड यांनी गावातील मुलींनी चिकाटीने शिक्षण पूर्ण करून प्रशासनात अधिकारी म्हणून रुजू होऊन गावाचे नाव देश पातळीवर न्यावे अशी आशा व्यक्त केली.
सर्वांना गावात येऊ वाटेल असे प्रसन्न वातावरण असावे ..
पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी गावात सुख, समृद्धी, शांतता तसेच कायदा-सुव्यवस्था नीट राहावी आणि सर्वांना गावात येऊ वाटेल असे प्रसन्न वातावरण असावे आणि पोलीस गाडीचे आगमन हे गावाच्या चांगल्या कार्यक्रमासाठी होईल याची काळजी घ्यावी तसेच जिल्ह्यातील बरेच ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या आहेत. त्यापैकी पाथरी गावचे नावही समाविष्ट आहे या माध्यमातून एक चांगला संदेश गावकऱ्यांनी दिला आहे.असे मत व्यक्त केले.
व्यायामाची व्यसने लावावीत…
सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त धनराज पांडे यांनी गावातील तरुण मुलांनी शरीर कमकुवत करतील अशी व्यसने करण्यापेक्षा शरीर मजबूत होतील अशी व्यायामाची व्यसने लावावीत तसेच वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात टाळतील व युवा पिढी वाचवावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी सायकलिस्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सारंग तारे यांनी सोलापूर जिल्ह्यात रोड चे जाळे वाढत असल्याने जिल्ह्यातील वेगवेगळ्या पर्यटन स्थळी भविष्यात भेट देणाऱ्यांची संख्या देखीक वाढत आहे आणि अश्या पर्यटन स्थळी शक्य असल्यास सायकलिंग चा प्राध्यान्याने वापर करावा आणि तेथील निसर्ग सौंदर्य अनुभवावे तसेच वाहतुकीचे नियम सुद्धा गंभीरपणे घेतले पाहिजेत असे प्रतिपादन केले.
सर्व ग्रामस्थांनी केलेल्या स्वागत आणि पाहुणचाराचे आभार फाउंडेशन चे सचिव श्री. भाऊराव भोसले यांनी केले,
यावेळी स्मार्ट रोड सेफ्टी फाऊंडेशन चे संस्थापक श्री. गणेश शिलेदार, डॉ. अशोक सुरवसे, श्री. नितीन चपळगावकर, श्री. शितल कोठारी, श्री. अभिषेक दुलंगे, श्री. बाहुबली शाह, श्री. विजय क्षीरसागर श्री. अभिनय भावठाणकर, श्री. आनंद हुलगेरी, श्री. ओम पोकरणा, श्री. तनय शहा, श्री. संकेत वाले, श्री. स्वयम येडके, श्री. मल्लिनाथ माळी, लेखाधिकारी श्री. विष्णू गाढे, कु. हर्ष गाढे, कु. जान्हवी गाढे, कु. श्रद्धा गायकवाड, कु. पार्थ व कु हर्ष क्षीरसागर, श्री. संजय ओझा, श्री. रमेश गोराडीया, इत्यादी सायकलस्वार उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. श्रीमंत बंडगर, श्री. अर्जून गायकवाड, श्री. संजय वाघमोडे, श्री. महादेव जाधव, पोलीस पाटील नागेश बंडगर, ग्रामसेविका सरवदे मॅडम, श्री मनोज मसलखांब, श्री गायधनकर, यांचे सहकार्य लाभले.
सायकलच बँक चे यावर्षी चे लाभार्थी
१)प्रगती प्रकाश मसलखांब इ९वी
२)ऋतूजा प्रकाश वाघमोडे इ९वी
Leave a Reply